21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeसोलापूरबार्शीत संतोष ठोंबरेंच्या के. टी ट्रॅक्टसला जागतिक बहुमान

बार्शीत संतोष ठोंबरेंच्या के. टी ट्रॅक्टसला जागतिक बहुमान

एकमत ऑनलाईन

बार्शी : जपानस्थित कुबोटा ऍग्रीकल्चर मशिनरी इंडिया कंपनीचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे कुबोटा ट्रॅक्टरचे वितरक बार्शी येथील के. टी. ट्रॅक्टर्स यांना २०२० या वर्षात ग्राहक सेवा, सेवा समर्थन, ग्राहक समाधान, शाखाविस्तार, सक्षम मनुष्यबळ, विक्रमी ट्रॅक्टर विक्री, बाजारातील कुबोटा टॅक्टरचा मार्केट शेअर आदी मापदंडामध्ये बाजी मारत चार वर्षात सलग दुस-यांदा देशात क्रमांक एक मिळवला आहे. कंपनीच्या वतीने देण्यात येणारी नंबर एकची एमडी ट्रॉफी त्यांना मिळाली आहे. के. टी. ट्रॅक्टर्सच्या वतीने चेअरमन तथा कार्यकारी संचालक संतोष ठोंबरे यांनी हे ऍवार्ड स्विकारले. यामुळे बार्शीचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे.

तालुक्यातील खामगाव येथील रहिवाशी असलेल्या संतोष ठोंबरे यांनी २०१० साली बार्शीतील लातूर रोडवर के. टी. ट्रॅक्टर हे कुबोटा कंपनीचे शोरुम सुरु केले. अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास संपादन करीत ट्रॅक्टर विक्रीमध्ये बाजी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे सोलापूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असून दोन्ही जिल्ह्यातील १८ शाखांच्या माध्यमातून ठोंबरे यांनी २०२० मध्ये कोरोना सारखी जागतिक महामारी असताना सुध्दा १००५ ट्रॅक्टरची विक्रमी विक्री केली आहे. तर मागील दहा वर्षात त्यांनी सहा हजारापेक्षा जास्त ट्रॅक्टरची व्रिकी करुन एक नवीन मापदंड तयार केला आहे.

एम. डी. ट्रॉफी देताना कंपनीने ट्रॅक्टर ग्राहकांना दिलेली सेवा, सर्व्हीस सपोर्ट, ग्राहकांचे समाधान, शाखाविस्तार, व सक्षम मनुष्यबळ, बाजारातील कंपनीचा मार्केट शेअर वाढवणे, आदी बाबींचा विचार करुन कंपनीचे संचालक तथा वरिष्ठ उपाध्यक्ष गुरमितंिसग ग्रेवाल व संचालक सिंतारो शेशीमोटो यांच्या हस्ते ऑलराऊंडर (एम.डी) ट्रॉफी देऊन संतोष ठोंबरे यांचा सोमवारी पुण्यातील कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी रिजनल मॅनेजर आशुतोष देशमुख, ऑल इंडिया मार्केंिटग हेड सागर मडला, महाराष्ट्र राज्य प्रमुख सचिन राजमाने, टेरीटरी मॅनेजर जितेंद्र तांबारे आदी उपस्थित होते. यावेळी Ÿके. टी. टॅक्टर्सला ‘बी’ सीरीजमधील ट्रॅक्टरच्या सर्वाधिक विक्रीबद्दल ही ट्रॉफी देऊन देखील सन्मान करण्यात आले.

के. टी. ट्रॅक्टर्सने देशात नव्हे तर जगात मिळवला प्रथम क्रमांक.ठोंबरे यांच्यासारखे डिलर आमच्या कंपनीला मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे उदगार महाराष्ट्र राज्याचे कुबोटा ट्रॅक्टर नमस्कार प्रमुख सचिन राजमाने यांनी काढले.

सर्वांच्या सहकार्यामुळेच यश – ठोंबरे
ग्राहकांना दिली जात असलेली घरपोच व तात्काळ सेवा, हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असलेले स्पेअर पार्ट, अनुभवी व प्रशिक्षीत मॅकेनिक, कर्मचारी वृंद व सर्व मित्रपरिवार यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असून या सर्व यशाचे श्रेय हे ग्राहकांचा के.टी. ट्रॅक्टर्सवर असलेला विश्वास व कर्मर्चा­यांनीही हे आपलेच शोरुम आहे असे समजून दिलेले योगदान, यामुळे हे यश संपादन करु शकलो.असे के. टी. ट्रॅक्टर्स,चे सीएमडी संतोष ठोंबरे यांनी सांगितले.

टाळेबंदीतून सुटका, २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार; ११ जिल्ह्यांना मात्र तूर्त दिलासा नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या