बार्शी : दिल्लीमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून चाललेल्या आंदोलनावर तोडगा न निघल्यामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांनी ‘ भारत बंद ‘ ची हाक दिली.त्या समर्थनार्थ बार्शी शहरामध्ये दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आला.यावेळी शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर व कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले होते.मोर्चाला सुरवात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारापासून झाली.मोर्चामध्ये बऱ्याच पक्ष,संघटनेचे पदाधिकारी होते.मोर्चाचा शेवट बार्शी तहसील कार्यालयाजवळ झाला.मोर्चाच्या सुरवातीला केंद्र सरकारने पास केलेल्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक २०२०, शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक २०२०,अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक २०२० या तीन कायद्याचा निषेध करून रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांनी आरएसएसची विचारधारा जपणारे हे सरकार भांडवलदारी विचारधारेचे असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या जमीनींचे कंपनीकरण करून शेतकरी उदवस्थ करून टाकायचा आहे,परंतू देशातील शेतकरी या कटा विरोधात चिकाटीचा लढा लढतील असे सांगितले तर शिवसेनेच्या भाउसाहेब आंधळकर यांनी भाजपा ही शेतकर्यांची लूट करण्याच्या उद्देशानेच कायदे करीत आहे या विरोधात शेतकरी वर्गासोबत आम्ही तिव्रपणाने लढत राहू असे सांगितले.
मोर्चात आणि बंदमध्ये अखिल भारतीय किसान सभा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,काँग्रेस आय,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,वंचित बहूजन आघाडी,अंधश्रध्दा निर्मूलन समिती,समता परिषद,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,संभाजी बिग्रेड,इंटक संलग्न राष्ट्रीय गिरणी कामागर संघ,आयटक डाॅ. जगदाळे मामा हाॅस्पीटल श्रमिक संघ,आयटक बांधकाम कामगार संघटना,आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन,भीम आर्मी,बहुजन समाज पार्टी,कन्फेडरेशन युनियन,बामसेफ,उडाण फाउंडेशन,राष्ट्रवादी लिगल सेल,एमआयएम, आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या.
त्या रोग्यांच्या रक्तात शिसे व निकेल धातूचे अंश; आंध्रप्रदेशमधील गुढ रोग