25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home सोलापूर खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोर्चाचे बार्शीत अर्धनग्न आंदोलन

खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीय बेरोजगार मोर्चाचे बार्शीत अर्धनग्न आंदोलन

एकमत ऑनलाईन

बार्शी:बार्शी तालुक्यात भारतीय बेरोजगार मोर्चाच्यावतीने भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजीराव बोकेफोडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने खाजगीकरणामुळे लोकांवर बेरोजगारीची वेळ आली असल्यामुळे आंदोलनाची वेळ आल्याची बोकेफोडे यांनी सांगितले.दरम्यान तालुक्यात अंदाजे शंभरच्या आसपास कार्यकर्त्यांनी घरीच अर्धनग्न होऊन केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन केले.

यावेळी १९९१ ला खाजगीकरणाला सुरवात काँग्रेस काळापासून खाजगीकरण,जागतीकरण,उदात्तीकरणच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले. त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदींचे सरकार आल्यानंतर १५० रेल्वे गाड्यांचे खाजगीकरण, विमानतळ, पेट्रोल कंपन्या, बीएसएनएल अशा कित्येक कंपन्यात खाजगीकरण आणल्यामुळे नोकऱ्या संपत आहेत.त्यामुळे हे अर्धनग्न आंदोलन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम राबवत असल्याचे बोकेफोडे यांनी सांगितले.

गंगाखेड पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव:सहा जण बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या