27.3 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home सोलापूर माकपकडून स्वच्छता उपकर विरुद्ध धरणे आंदोलन

माकपकडून स्वच्छता उपकर विरुद्ध धरणे आंदोलन

एकमत ऑनलाईन

सोलापूर दि.१९:- स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर अशा घोषणा शहरातल्या अनेक रस्त्यालगत असणाऱ्या भिंतीवर लिहिलेले दिसून येतात. आपले सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर असलेच पाहिजे याबाबत प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने वागलेच पाहिजे. परंतु गेल्या ५ वर्षापासून सोलापूर स्मार्ट सिटी या गोंडस नावाखाली शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम केले. अद्यापही त्या रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झालेली नाही यामुळे धुळीचे प्रदूषण वाढलेले आहे. याबाबत पालिका प्रशासन दक्ष नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

शहरात अत्यावश्यक नागरी सेवा सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आणि यंत्रणा पालिका प्रशासनाकडे नाही. तसेच गेल्या ८ महिन्यापासून कोविड-१९ कोरोना विषाणूचे भूत सोलापूरकरांच्या मानगुटीवर असताना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता स्वच्छता उपकर लादले. वास्तविक पाहता स्वच्छता उपकर लागू करण्याआधी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणीची यंत्रणा पूर्णतः अद्यावत स्वरूपात तयार आहे कि नाही याची माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. स्वच्छता उपकर म्हणजे काय अद्यापही गोरगरीब कष्टकऱ्यांना माहित नाही. म्हणून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करण्याच्या हेतूने लादलेले स्वच्छता उपकर रद्द न केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येताच ५० हजार श्रमिकांना घेऊन इंद्रभवनला घेराव घालणार असा इशारा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सोलापूर महानगरपालिका येथे आंदोलकांना संबोधित करताना दिला.

शनिवार दि. १९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर महानगरपालिका इंद्रभवन येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. आडम मास्तर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगर पालिकेमार्फत लागू करण्यात आलेले स्वच्छता उपकर तातडीने रद्द करावे. हि प्रमुख मागणी घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मा. महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, पक्षनेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेता महेश कोठे व अन्य पदाधिकारी यांना निवेदने देण्याकरिता शिष्टमंडळ गेले असता सर्व पदाधिकारी विलीगीकरण असल्यामुळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बजरंग साळुंके यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी माकपाचे माजी नगरसेवक व प्रमुख नेते यांनी महापालिका उपकर रद्द करा, लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा, असंघटीत कामगार व श्रमिकांना १० हजार रुपये अनुदान तातडीने अदा करा, बेरोजगारांना रोजगार द्या, कोरोनावर प्रभावी उपाययोजना व आरोग्य सुविधा द्या, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा अशा घोषणांचे डिजिटल जॅाकेट परिदान करून पालिका प्रशासनाचे व आंदोलकांचे लक्ष वेधले.

यावेळी आडम पुढे म्हणाले कि, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ४५० (अ) तसेच, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ३१२ (अ) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, शासनाने घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता व आरोग्य उपविधी विहित करून आकारलेले शुल्क हे सर्वसामान्य जनता, हॉकर्स, किरकोळ व्यापारी व विक्रेते, झोपडपट्टीधारक व मध्यमवर्ग, वस्त्या यांच्यासह बहुसंख्य समाज घटकांवर अन्यायकारक आहे. यापूर्वीच युजर्स चार्जेसच्या नावावर अनेक ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नसलेल्या वसाहतीतही वसूल केले जात आहे. सार्वजनिक नळपट्टी, सफाईपट्टी आकारले जाते. परंतु वास्तविक स्वरूपात अनेक वसाहतीत त्या सुविधांच उपलब्ध करून दिले जात नाहीत.

सद्यस्थितीत नोटाबंदीनंतर, सतत झालेली कामगार कपात व आता सुरु असलेले अनलॉक मध्येही बेरोजगारी वाढतच आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी, झोपडपट्टीवासीय जनतेला दिलासा देण्याएवजी घरे व आस्थापनांच्या मधून कचरा संकलन करण्यासाठी दर / उपयोगकर्ता शुल्क हे एक प्रकारची पिळवणूकच असून त्यामुळे सर्वसामान्यांवर अधिकचा बोजा पडणार आहे. तरी राज्यातील महानगरपालिका / नगर परिषदा / नगर पंचायतीमध्ये घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र.स्वगअ-२०१७/प्र.क्र.१२६/नवि-१४, मंत्रालय, मुंबई-३२ यांचे दि. ११ जुलै २०१९ चे परिपत्रक मागे घ्यावे व महाराष्ट्र शासनाने त्यांच्या तिजोरीतून हा खर्च उचलावा अशी मागणी करीत आहोत.

जर गरीब कष्टकरी, झोपडपट्टीवासीय व मध्यमवर्गीयांना अशा मोफत सुविधा देण्यास अडचणी असतील तर उद्योजक, भांडवलदार यांना देण्यात येणाऱ्या सवलती रद्द करून शासनाने हा भार उचलावा. अशी मागणी यानिमित्ताने आम्ही करत असून तसे न केल्यास याविरुद्ध दाद मागण्यासाठी योग्य त्या सनदशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीस शासनच जबाबदार असेल.

यावेळी नसीमा शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख (मेजर), म.हनीफ सताखेड, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, सलीम पटेल, माशाप्पा विटे, मुरलीधर सुंचू, अनिल वासम, अशोक बल्ला, दाउद शेख, नरेश दुगाणे, लिंगव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, विल्यम ससाणे, बापू साबळे, अकिल शेख, बापू कोकणे, जावेद सगरी, प्रशांत म्याकल, सिद्धाराम उमराणी, विक्रम कलबुर्गी, वासिम मुल्ला, हसन शेख, रफिक काझी, दीपक निकंबे, अप्पाशा चांगले, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याल, श्रीनिवास गड्डम, मोहन कोक्कुल, गीता वासम, बालाजी गुंडे, मल्लेशम कारमपुरी, शाम आडम, दिनेश बडगु, मल्लिकार्जुन बेलीयार, अंबादास बिंगी, रवींद्र गेंटयाल, बजरंग गायकवाड, इब्राहीम मुल्ला, युसुफ शेख,किशोर गुंडला, प्रभाकर गेंटयाल, पुष्पा पाटील, भारत पाथरूट, गंगाराम निंबाळकर, प्रशांत चौगुले, वीरेंद्र पद्मा आदींसह शेकडो कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभाग नोंदवले.

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

सोलापूर शहर जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शाळेला संमिश्र प्रतिसाद

सोलापूर : जिल्ह्यात जवळपास ८ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असुन कोरोना प्रादुर्भावामुळे शहर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. शाळा सुरु होण्यापूर्वी...

भाजपच्या वतीने वीज बिलांची होळी

मोहोळ : संपूर्ण वीज बील माफी झालीच पाहिजे, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय देत नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करत मोहोळ तालुका भाजपाच्या वतीने...

शेवते रस्ता एक महिन्यापासून पाण्यात

जांबुड : पाझर तलावाच्या पाण्यात गेलेल्या नेमतवाडी ते शेवते रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेले लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले आणि पाहणी करून माघारी गेले परंतु...

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी

सोलापूर : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या...

सुशिलकुमार शिंदेंचे फोटो टाळले समर्थक भिडले

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे डिजीटल फलकावर महाविकास आघाडीकडून फोटो लावण्यास टाळल्याने शिंदे समर्थक भिडले. महाविकास आघाडीकडून हेरिटेज गार्डन येथे पदवीधर...

इलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू

सांगोला (विकास गंगणे) : सांगोला तालुक्यातील जवळा भोपसेवाडी या रोडचे दि.२२ नोव्हेंबर रोजी रविवार सुट्टीच्या दिवशी पीडब्ल्यूडी च्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या अनुपस्थित काम सुरू असताना...

सांगोला येथे वीज बिलाची होळी

सांगोला (विकास गंगणे) : लाकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला भरमसाठ बीज बिले देण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे . सरकारला सत्तेच्या...

कार्तिकी यात्रेत विठ्ठलाचे मुखदर्शन राहणार बंद; विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर : कार्तिकी एकादशी सोहळ्या दरम्यान पंढरपूरात गर्दी होऊ नये यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस पंढरीच्या पांडुरंगाचे मुखदर्शन बंद राहणार आहे....

मोहोळ येथे भीषण अपघात ; कंटेनर व टँकर जळून खाक

मोहोळ (राजेश शिंदे) : कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकरची व मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाडीची समोरासमोर सकाळी साडेदहाच्या सुमारास जोराची...

अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी

मोहोळ (राजेश शिंदे) : मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यातील बायोगॅसची टाकी अचानक खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...