29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeसोलापूरप्रेमसंबंधातून महिलेस मारहाण; पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

प्रेमसंबंधातून महिलेस मारहाण; पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा : प्रेमसंबंधातून घरी येऊन माझ्याशी संबंध का ठेवत नाही म्हणत एका महिलेला केबलने व डा प्लास्टिकच्या पाईपने घराबाहेर ओढून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी राहुल घाडगे (रा.आंबे, ता. पंढरपूर) व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिस सूत्राकडील माहितीनुसार पीडित महिला व आरोपी राहुल घाडगे यांचे प्रेमसंबंध होते. तो सारखा घरी यायचा. २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वा. आरोपी व इतर अनोळखी लोकांना घरी घेऊन आला. पीडितेस तू माझ्याशी संबंध का ठेवत नाही म्हणत केबलने व प्लास्टिकच्या पाईपने घराबाहेर ओढून बेदम मारहाण केली. या भांडणाचा आवाज ऐकून एक ५० वर्षीय महिला सोडवायला गेली. असता आरोपींनी तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. घटनेनंतर पीडित महिला ही लगेच तक्रार करण्यास आली नाही. २७ सप्टेंबर रोजी आरोपी राहुल घाडगे याने पुन्हा घरी येऊन शिवीगाळ केल्याने दोघी महिला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या. दरम्यान, जखमी महिलांना पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. अधिक तपास शहर बीटचे हवालदार हजरत पठाण हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या