सोलापूर : दारूच्या नशेमध्ये तीन जणांनी मिळून मित्राला मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी हर्षद रामकृष्ण चिंतनसुरे (वय २८, रा. भारतनगर, कुमठा नाका) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून तिघांवर पुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हर्षद हा आरोपी अविनाश माळवदकर, (रा.शेळगी), ऋषी कदम (रा.मोदी, पाच कंदीलजवळ), ऋतुराज घोडके (रा. मोदी) या तिघांसोबत रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रिक्षातून क्षत्रिय गल्ली येथून जोडभावी पेठमार्गे जेवणासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी दारूचे नशेत रिक्षातच हर्षल याला हाताने मारहाण
करू लागले.
यामुळे हर्षद हा रिक्षातून खाली उतरला. त्यानंतर, घोडके याने तोंडावर बुक्की मारल्याने तो जखमी झाला, शिवाय कदम याने लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले, अशा आशयाची फिर्याद हर्षद चिंतनसुरे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.