22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeसोलापूरवर्गणी दिली नाही म्हणून मारहाण

वर्गणी दिली नाही म्हणून मारहाण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : उत्सवासाठी दहा हजार रुपये वर्गणी दिली नसल्याच्या कारणातून दहा जणांनी मिळून घरात घुसून दोन तरुणांना मारहाण केल्याची घटना सोलापुरात घडली. याबाबत दिगंबर दिलीप विटकर ( वय ३०, रा. परळकर नगर, आकाशवाणी केंद्राजवळ, गवळी वस्ती) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी विटकर हे आकाशवाणी केंद्राजवळ राहतात. फिर्यादी घरात असताना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना आरोपी अनिल ंिनबाळकर, सुनील निबांळकर, आर्यन व त्यांच्या सोबतीला ६ ते ७ जणांनी मिळून विटकर यांना उत्सवासाठी दहा हजारांची वर्गणी मागितली. ही वर्गणी देण्यासाठी विटकर यांनी नकार दिला. यामुळे फिर्यादीला व फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागले.

याचवेळी आरोपींनी घरात घुसून घरातील शौचालयाचा दरवाजा, किचनमधील फ्रिजचे नुकसान केले. शिवाय कपाटातील रोख दोन हजार रुपये संमती वाचून चोरून नेले, अशा आशयाची फिर्याद दिगंबर विटकर यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वरील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पेटकर हे करीत आहेत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या