22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसोलापूरमनपा अधिकार्‍यास मारहाण; रियाज हुंडेकरीसह चौघांवर गुन्हा दाखल

मनपा अधिकार्‍यास मारहाण; रियाज हुंडेकरीसह चौघांवर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शासकीय काम जवरदस्तीने करण्यास दबाव टाकत, दडपशाहीने व मारहाण करत महापालिकेतील आरोग्य निरीक्षकास ड्रेनेजच्या पाण्यानं अंघोळ घातली.. शासकीय कामात अडथळा आणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी नगरसेवक रियाज हंडेकरी याच्यासह चौघांवर केल्याप्रकरणी व अनुसूचित जमातीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मनपा आरोग्य निरीक्षक महादेव दत्तात्रय शेरखाने (३९, रा. . अशोकनगर, विजापूर रोड) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

महादेव शेरखाने हे विभागीय कार्यालय आठ येथे कार्यरत आहेत. २८ जुलै रोजी कार्यरत असताना रिवाज हुंडेकरी याने फोन करून ७० फूट परिसरातील मज्जिदच्या बोळात बोलविले त्यावेळी शेरखाने हे घटनास्थळी गेल्यानंतर तिथे आरोपी हुंडेकरीसह . मनपाचे काही कर्मचारी आणि वीस ते पंचवीस नागरिक थांबले होते. त्यावेळी तेथे परिसरात ड्रेनेजचे पाणी तुंबून वाहत असल्याचे दाखविले. शेरखाने यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी ‘हे काम माझे नाही, ज्युनिअर इंजिनिअर यांचे काम आहे’, असे सांगितले. यावेळी रियाज हुंडेकरी याने शेरखाने यांचे दोन्ही हात पकडले व तेथे पूर्वीपासून थांबलेल्या तिघांनी बादलीतील इनजच्या पाण्यानं त्यांना अंघोळ घातली. मैलामिश्रित पाणी त्यांच्या अंगावर टाकले. सहकारी कर्मचाऱ्यांनी सोडवण्यासाठी आल्यानंतर दोन जणांनी त्यांना मारहाण केली. त्याचवेळी एका तिसऱ्या इसमाने शेरखाने यांना पाठीमागून कमरेत लाथ मारली. यामुळे ते गटारीत पडले. त्यानंतर काही वेळाने कर्मचार्‍यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. तपास सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी करत आहेत.

महापालिकेचे आरोग्य निरीक्षक महादेव शेरखाने यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय होता. नगरसेवकाच्या समोर हा हल्ला झाला. वास्तविक त्यानी असे घडू द्यायला नको होते. या प्रकाराला मनपा आयुक्त पी. शिवशंकरही जवाबदार आहेत. पालिकेत कामाच्या पध्दती चुकीच्या होत आहेत. ज्याचा संबंध नाही अशा अधिकाऱ्यांना इतर कामावर पाठविले जात आहे. यातूनच हल्ल्याचे प्रकार घडत असल्याचे महापालिका कामगार कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यानी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या