24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeसोलापूरबीअरबार, परमिट रूम परवाना देण्याचे आमिष दाखवून हॉटेल मालकाला गंडा

बीअरबार, परमिट रूम परवाना देण्याचे आमिष दाखवून हॉटेल मालकाला गंडा

एकमत ऑनलाईन

सांगोला : पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, तहसील कार्यालयासह पुढा-यांची ओळख असल्याचे सांगून बीअरबार व परमिट रूमचा परवाना देण्याचे आमिष दाखवून सांगोल्यातील हॉटेल व्यावसायिकाची सुमारे १ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत नवनाथ अंकुश केदार (रा. वासूद, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आनंदा नागनाथ यादव (रा. बार्शी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी नवनाथ केदार यांची कमलापूर (ता. सांगोला) हद्दीत मिरज रोडच्या दोन्ही बाजूस दोन हॉटेल्स आहेत. नवनाथ केदार यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर कार्यालयाकडे नवीन बीअरबार व परमिट रूमची अनुमती मंजूर होऊन मिळण्यासाठी अर्ज दिला होता. त्यासाठी लागणा-या सर्व शासकीय कागदपत्रांची त्यांनी पूर्तता केली होती. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे सदर प्रकरण मंजुरीसाठी दिल्यानंतर त्यांना आनंदा यादव यांचे वारंवार फोन येऊ लागले. वरील सर्व कार्यालयातील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत.

लोकप्रतिनिधी, पुढा-यांच्या ओळखी असल्याचे सांगून त्याने पंढरपूर भागात नवीन परमिट रूम परवाना दिला आहे. त्याचे काम मीच केले आहे. यासाठी अगोदर १ लाख रुपये व काम झाल्यानंतर १ लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले, काम रद्द होण्याची भीती वाटल्याने नवनाथ केदार यांनी त्याच्या खात्यात १ लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर आनंदा यादव यांनी काम पूर्ण होण्यासाठी आणखी १ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी त्याच्या खात्यावर पुन्हा १ लाख रुपये पाठवले. दरम्यान, २ लाख रुपये देऊनही नवनाथ केदार हे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात गेले असता पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून परमिट रूम परवाना देऊ नये असा अहवाल आल्याची माहिती त्यांना मिळाली.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे सादर केल्यानंतर नियमानुसार त्यांना बीअरबार व परमिट रूमचा परवाना प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी २ लाख रुपये परत देण्यासाठी आनंदा यादव यांना वारंवार फोन केला. यावेळी त्याने नवनाथ केदार यांच्या खात्यात १ लाख रुपये पाठवले. उर्वरित १ लाख रुपये देण्यासाठी टाळाटाळ करून आपली फसवणूक केल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या