तालुकाप्रतिनिधी/बार्शी
बार्शी तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन हे पीक कॅश क्रॉप म्हणून मोठया प्रमाणात घेतले जाते. खरीप हंगाम 2021 मध्ये अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे खरीप हंगाम 2022 साठी कृषी विभाग बार्शी ने सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी विशेष अष्टसुत्रीचा वापर करणे बाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर श्री बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी श्री रंिवद्र कांबळे ,तालुका कृषी अधिकारी बार्शी श्री शहाजी कदम यांचे मार्गदर्शनात सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, व ग्रामस्तरावर कृषी सहायक काम करीत आहेत.
खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकरी पेरणी पूर्व मशागत कामात व्यस्त आहेत. खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीन क्षेत्र 49893 हेक्टर होते तर उत्पादन 1174 किलो /हेक्टर एवढे होते. खरीप हंगाम 2022 साठी सोयाबीन चे प्रस्तावित क्षेत्र 55000 हेक्टर उत्पादकता 1409 किलो/हेक्टर एवढी प्रस्तावित आहे.यासाठी लागणा-या 41250किं्वटल बियाणे पैकी 26812किं्वटल शेतकरी स्वत: बिजोत्पादनातून महाबीज मार्फत 2475किं्वटल तर खाजगी कंपनी मार्फत 11963किं्वटल सोयाबीन बियाणे उपलब्ध करण्यात येत आहे. सोयाबीन उत्पादन वाढीसाठी अष्टसूत्रीमध्ये घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करून 75 ते 80 टक्के उगवण असलेले बियाणे वापर,10 वर्ष आतील वाणाची निवड,उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया,75 ते 100 मि. मि पावसानंतरच पेरणी करणे,पेरणी साठी बी.बी .एफ तंत्रज्ञानाचा वापर, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर,एकात्मिक कीड व्यवस्थापन,संरक्षित ओलिताची वापर व पीक विमा योजना इत्यादी विषयी जनजागृती करण्यात येत आहे.
पावसाळ्यात सलग 2 ते 3 दिवसात 75 ते 100 मि. मि पाऊस झाल्यावरच सोयाबीन पेरणी करावी,तिफनीने सर्वसाधारण पेरणी केल्यास 26 ते 30 किलो प्रति एकर,बी बी एफ ने पेरणी केल्यास 22 किलो /एकर,सरीवरंब्यावर टोकन पध्दतीने पेरणी केल्यास 15 किलो /एकर ,पट्टा पेर पद्धतीने 24 किलो प्रति एकर वापरावे.आंतर पीक सोयाबीन व तूर पीक म्हणून ही लागवड करण्यात यावी, असे उपविभागीय कृषी अधिकारी, कुर्डुवाडी रवींद्र कांबळे यांनी सांगितले. पेरणी करताना बियाणे 3 ते 5 सें. मी वर जमिनीत पडत असल्याची खात्री करा शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा दयावी युरिया खतांचा दुसरा डोस देऊ नये. तण नियंत्रणासाठी 17 ते 20 दिवसांनी इम्याझेथायपर 10 एस.एल 300 ते 400 मिली प्रति एकर फवारावे.यासाठी आवश्यकतेनुसार 200 ली पाण्याचा वापर करावा.फवारणीसाठी स्टिकर वापरावे, असे कृषी पर्यवेक्षक गुणनियंत्रण कृषी विभाग बार्शी गणेश पाटील यांनी सांगितले. ओलसर केलेल्या बारदाण्यामध्ये 100 सोयाबीनच्या बिया 10 ओळीत सारख्या अंतराने पसरून बारदाण्याची गुंडाळी दोरीच्या साहाय्याने बांधून झाडाखाली सावलीत ठेवावी या गुंडाळीवर 4 दिवस दिवसातून 4 वेळा पाणी शिंपडावे . 5 व्या दिवशी ही गुंडाळी सोडून 100 पैकी किती सोयाबीन बिया उगवल्या आहेत हे तपासून घ्यावे.