22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeसोलापूरसंस्मरण उद्यान प्रकरण, शौकत पठाणांवर अब्रुनुकसानी दावा ठोकण्याचा बेरीयांचा इशारा

संस्मरण उद्यान प्रकरण, शौकत पठाणांवर अब्रुनुकसानी दावा ठोकण्याचा बेरीयांचा इशारा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : संस्मरण उद्यानाच्या प्रकरणात माझा काडीचाही संबंध नाही. यात माझे नाव घेणे खोटेपणा आहे. खोटी केस करण्यासाठी जाणून बुजून नाव घेतलेले आहे. यापूर्वीही माझ्यावर खोटी केस केली होती. या प्रकरणात मात्र मी शौकत पठाण यांच्यावर अबू नुकसानीचा खटला दाखल करणार आहे. असे माजी महापौर यू. एन. बेरिया यांनी सांगीतले. महापालिकेच्या गांधीनगर येथील संस्मरण उद्यान प्रकरणात दोघांनी खंडणी मागितल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते शौकत पठाण यांनी केला. यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या तक्रारीत पठाण यांनी माजी महापौर यू. एन. बेरिया, अस्लम मुन्शी, सैफन शेख, रझाक मकानदार, सादिक जहागीरदार यांची नावे घेतली आहेत. पोलिसांनी मुन्शी आणि सैफन शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला. बेरिया यांनी पठाण यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला. महापालिकेने २०१५ मध्ये संस्मरण उद्यानाची जागा शौकत पठाण यांच्या शिवरत्न क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळाला दिली होती. वर्षासाठी ५० हजार रुपयांचे भाडे ठरले होते. ही जागा उद्यानाची आहे. त्यामुळे संपूर्ण जागा उद्यानासाठी खुली राहावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती.

शिवरत्न संस्थेचा करार २०१९ संपुष्टात आला यानंतर मात्र या भागातील कार्यकर्ते आणि पठाण यांच्यात वाद सुरू झाले पालिकेसमोर आंदोलन, उपोषण सुरू होती. या जागेचा एक वाद न्यायालयात पालिका प्रशासनाच्या स्तरावर सुरू होता तर बाहेर कार्यकर्त्यांचे वाद सुरू होते अखेर या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल झाला. पठाण यांनी या प्रकरणात एकूण पाच जणांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यासंदर्भातील पुरावे असल्याचा दावा पठाण करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या