32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeसोलापूरभगीरथ भालके यांनी भारतनानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे

भगीरथ भालके यांनी भारतनानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : भाजपाचे नेते कल्याणराव काळे यांनी पंढरपूर येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन, अशी हमी यावेळी अजित पवारांनी दिली.

राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पंढरपूर येथील श्रीयस पॅलेस येथे झाली. यावेळी त्यांनी केंद्रावर टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय मामा शिंदे, बळीराम काका साठे, उमेश पाटील, दीपकआबा साळुंखे पाटील, शिवसेनेचे संभाजी शिंदे, अनिल सावंत, साईनाथ अभंगराव, महावीर देशमुख उपस्थित होते.

लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. १८ वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या. परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वत:चं पोट उपाशी ठेवून शेजा-याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरमवर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते.’’ असंही अजित पवार म्हणाले.

‘हे पांडुरंगा राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर’ असं म्हणत अजित पवारांनी पांडुरंगाला साकडे घातले. ‘‘कोरोना राज्यात वाढलाय. त्यासाठी नियम पाळावे लागतायत. कोरोना नियंत्रणसाठी केंद्राने लस द्यायला पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत. भाजप हा ग्रामीण भागात फारसा लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे आहेत, हे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे. काळानुरुप नवीन लोकांना संधी द्यावी लागते’ असंही अजित पवार म्हणाले.

पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवार बोलायला उभे राहिले. अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर ‘दादा मास्क काढा’ असं लिहिलेलं होतं. ती चिठ्ठी अजित पवारांनी जाहीर वाचून दाखवली. ‘मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा म्हणून, असं अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला.

यावेळी पवारांनी वेगळ्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. ‘‘कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. भाजपचे सगळेच कल्याणरावांच्या घरी जायला लागले. शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांना निरोप आहे, की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे’ असं अजितदादांनी कल्याणरावांना यावेळी सांगितले.

दहावी, बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या