18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeसोलापूरटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शनिवारी दुचाकीवरून रेशन घेण्यासाठी शिंगडगावहून सोलापूरकडे येताना टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. लक्ष्मण श्रीमंत इंगळे (वय २९, रा. शिंगडगाव, द. सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

लक्ष्मण इंगळे हे शिंगडगाव येथे शेतात चाकरी करत होते. ते रेशन घेण्यासाठी आणि गाडीचा हप्ता भरण्यासाठी शनिवारी सायंकाळी सोलापूरकडे येत असताना, त्यांना सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळ समोरून येणा-या टेम्पोने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला जखम झाली. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले

दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस घेण्यासाठी चौकीत झाली आहे. अपघातात पतीचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाइकांना कळाली. शनिवारी सायंकाळी नातेवाइकांसह पत्नीला रुग्णालयात दाखल झाली. आपल्या पतीला निपचित पडलेले पाहून तिने हंबरडा फोडला. ती धाय मोकलून रडत होती. तिचा आवाज काळीज पिळवटून टाकणारा होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या