19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeसोलापूरजीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, जीपचालकावर गुन्हा दाखल

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, जीपचालकावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

बार्शी : १५ दिवसांपूर्वी बार्शी येथून किराणा बाजार घेऊन गावाकडे निघालेला दुचाकीस्वार बाळासाहेब शेषराव माने (वय ३९, रा. दहिटने, ता. परांडा) यास भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या जीपने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जीप चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

१८ सप्टेंबर रोजी हा अपघात झाला होता. मयत बाळासाहेब माने यांचा मावस भाऊ नितीन चौधरी (वय ३५, रा. देगाव खुर्द, ता. परांडा) याने तालुका पोलिसांत ४ ऑक्टोबर रोजी तक्रार नोंदवली होती. याप्रकरणी जीपचालक राहुल बजरंग घळके (रा. कव्हे, ता. बार्शी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी नितीन चौधरी हा इंद्रेश्वर साखर कारखाना उपळाई (ठो. ता. बार्शी) येथे नोकरीस आहे. तो १८ ऑक्टोबर रोजी काम संमपवून गावी निघाला होता. लक्ष्याचीवाडी जवळ येताच बार्शीहून परांड्याकडे जाताना मावस भाऊ दिसला. त्यास विचारताच किराणा बाजार घेऊन निघालो, असे म्हणून तो पुढे निघून गेला. काही वेळेने फिर्यादीस ओव्हरटेक करून भरधाव जीप त्यांच्या दुचाकीस धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच फिर्यादी पाठीमागे आला आणि मावस भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी साखर कारखान्यातील मित्रांना बोलावून त्यास दवाखान्यात दाखल केले होते. उपचार सुरू असताना २७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी जीप चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या