24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeसोलापूरवाढदिवसाचे रूपांतर दगडफेकीत, अनेक जखमी; गुन्हा दाखल

वाढदिवसाचे रूपांतर दगडफेकीत, अनेक जखमी; गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : वाढदिवसाच्या कारणावरून मुकुंदनगर येथे दोन गटात दगडफेक झाली. हा प्रकार शुक्रवारी (दि.३ जून) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. यावेळी सुमारे १०० लोकांचा जमाव जमला होता. दगडफेकीत जमावातील काही लोक जखमी झाले आहेत. पोलिस वेळेत आल्याने पुढील अनर्थ टळला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंद नगर परिसरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याच्या कारणावरून भालशंकर व गायकवाड या दोन गटात हाणामारी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूकडील लोकांनी रस्त्यांवरील दगड व विटा एकमेकांवर फेकल्या. मुकुंद नगर येथील सार्वजनिक रोडवर वाढदिवस साजरा करताना रहदारीला अडथळा झाला होता. त्यावेळी भालशंकर व गायकवाड गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरूवातीला शाब्दिक चकमक झाली. दोन्ही गटाचा मोठा जमाव जमला.

त्यावेळी दोन्ही गटांनी विटा व दगडफेक करण्यास सुरु केली. दरम्यान या संदर्भात जोडभावी पेठ पोलिसांना घटनेची माहिती समजताच तात्काळ त्याठिकाणी पोलिस दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून वाद मिटला. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी झालेल्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दरम्यान, वाढदिवस रस्त्यावर साजरा करणे हा गुन्हाच असून कायदा हातात घेणे हाही मोठा गुन्हा आहे. त्यामुळे दोन्ही गटातील व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या