गोपाळपूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने गोपाळपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ७०० रक्तदात्यांनी आपली नावे नोंद केली आहेत. सदरचे रक्तदान शिबिर दोन दिवस चालणार असून पहिल्या दिवशी ३५० नागरिकांनी रक्तदान केले आहे. तर दुस-या दिवशी ३५० नागरिकांचे रक्तदान होणार आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढूलागल्याने राज्यात मोठ्याप्रमाणावर रक्ताची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राज्याभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.या अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये ७०० नागरिकांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदवली आहेत. या कार्यक्रमासाठी रंगराव कुलकर्णी, काकासाहेब ंिशदे, भोजने वकील, कृष्णा यवनकर, दिलीप गुरव, शिवाजी आसबे,प्रशांत जाधव, उदय पवार, विठ्ठल जगताप, डॉ. पी. एस पाटील, अमोल म्हेत्रे, किरण शहा यांच्यासह गोपाळपूर ग्रामस्थ व श्री समर्थ दास मंडळी उपस्थित होते.
Read More हिंगोलीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सराफा असोसिएशनची २ ऑगस्टपासून बंदची हाक