21.2 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home सोलापूर टिपर-मोटार सायकलच्या अपघतात दोघे ठार

टिपर-मोटार सायकलच्या अपघतात दोघे ठार

एकमत ऑनलाईन

अकलुज : पालखी मार्गाच्या कामावरील एस एम अवताडे कंट्रक्शन अँड कंपनी मंगळवेढा यांच्या टिपर खाली एम एच 98 84 मोटरसायकल जाऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची घटना वेळापूर तालुका माळशिरस येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. पालखी मार्गाच्या कामावरील मंगळवेढा येथील अवताडे कंट्रक्शन अँड कंपनीच्या टिपर खाली( एम एच 98 84 )मोटरसायकल जाऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार आणि एक गंभीर जखमी झाल्याची घटना वेळापूर तालुका माळशिरस येथे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

वेळापूर च्या पूर्वेला उघडेवाडी रोड क्रॉंिसग वर घडलेले या अपघातात मोटारसायकलवरील तुषार शहाजी जाधव वय 18 या शाळकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला तर देवा बाबासाहेब माने वय 28 यांचा उपचाराला नेताना मृत्यू झाला तर तिसरा तरुण धनंजय संजय माने वय17 गंभीररीत्या जखमी असून अकलूज येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृत तरुणांच्या मृतदेहाचे तुकडे घटनास्थळी इतरत्र विखुरलेले होते प्रत्यक्षदर्शी नातेवाईकांच्या मते एक पोलिस कर्मचा-याने मोटरसायकलवरून केलेल्या पाटलागामुळे हे अपघात ग्रस्त तरुण टिपर खाली आले.

संतप्त नातेवाईकांनी संबंधित पोलिस कर्मचा-याच्या अटकेसाठी आणि निषेधार्थ घटनास्थळी मृतदेहाभोवती कडे करून रस्ता रोखून धरला. वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह उचलण्यास परवानगी दिली मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर संतप्त नातेवाईकांच्या वेळापूर पोलीस स्टेशन मध्ये येऊन आपदग्रस्त तरुणाचा विना गणवेश पाठलाग करणा-या पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरून पोलीस स्टेशनच्या समोर अकलूज सांगोला रोडवर ठिय्या धरला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू यांनी वेळापूर येथे धाव घेऊन सूत्रे आपल्या हाती घेतली व वेळापूर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

‘सुरक्षीत अंतर’ हाच कोरोनापासून बचावाचा अंतिम पर्याय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या