बार्शी : शहरातील पंकजनगर येथील पत्र्याच्या शेडच्या मागे मित्रांसोबत बोलत असताना चार जणांनी येऊन तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून विशाल विठ्ठल रणदिवे (रा. झाडबुके मैदान, बार्शी) यास व विजय आदमिले यास कोयत्याने व लाकडाने मारहाण केली.
ही घटना १६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत विजय आदमिले यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विशाल सुनील बनसोडे, स्वप्निल सूर्या स्वामी (दोघे रा. वाणी प्लॉट), विकास पारसे व नीलेश पवार दोघे (रा. पंकजनगर, बार्शी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय आदमिले हे १६ एप्रिल रोजी पंकजनगर येथे विशाल गायकवाड याचे पत्र्याच्या शेडजवळ विशाल रणदिवे व खंडू शिंदे यांच्यासोबत उभे असताना चौघेजण हातात कोयता व लाकडी दांडके घेऊन विशाल रणदिवे तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून डोक्यात, हातापायावर कोयत्याने, लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच डोळ्यात चटणी टाकून बेदम मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि सिरसट करत आहेत.