31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeसोलापूरबारावी बोर्डाच्या प्रत्याक्षिक व लेखी परीक्षेवरही बहिष्कार आंदोलन सुरू

बारावी बोर्डाच्या प्रत्याक्षिक व लेखी परीक्षेवरही बहिष्कार आंदोलन सुरू

एकमत ऑनलाईन

सोलापूर ’ विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचा-यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या ६ मागण्यासाठी परीक्षावर बहिष्कार आंदोलनाचा शनिवारी तिसरा दिवस आहे. शहर व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालतील शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यापीठाबरोबरच बारावी बोर्डाच्या प्रत्याक्षिक व लेखी परीक्षेवर बहिष्कार आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहन कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी केले आहे.

दरम्यान शनिवारी आमदार रणजितंिसह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते व राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. प्रलंबित असलेल्या ६ मागण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या