22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरसोलापुरात लाचखोर पोलिस आणि टुर्स चालकास अटक

सोलापुरात लाचखोर पोलिस आणि टुर्स चालकास अटक

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पासपोर्ट व्हेरीफीकेशनसाठी दीड हजारांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उप निरीक्षक व टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालकास सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

सहायक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गणपत शिंदे (वय ५७ वर्षे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, जेलरोड पोलिस ठाणे सोलापूर शहर), सलाहुद्दीन लायक अली मुल्ला (वय ४६ वर्षे, व्यवसाय टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालक) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार यांनी पासपोर्ट मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. हा अर्ज व्हेरीफिकेशन व पत्ता पडताळणी कामी जेलरोड पोलिस ठाणे सोलापूर शहर येथे पडताळणी होऊन पुढील कार्यवाही होण्यासाठी प्राप्त झाला होता. तक्रारदार हे पासपोर्टचे अनुषंगाने पाठपुरावा करीत असताना यातील लोकसेवक शिंदे यांना भेटला.

लोकसेवक असलेला सहायक पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी तक्रारदार यांना पासपोर्टचे अनुषंगाने पत्त्याबाबतची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करण्याकामी १५०० रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम यातील आरोपी क्रमांक दोन खाजगी इसम मुल्ला यांचे मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले व यातील आरोपी क्र.०२ मुल्ला यांनी त्यास संमती दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून सविस्तर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार- घुगे, घाडगे, जानराव, किणगी, सोनवणे, सण्णके, पकाले, सुरवसे यांनी केली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या