33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home सोलापूर फोडले ड्रम , फुटल्या बाटल्या; अकलूज पोलीसांच्या कारवाईने हातभट्टीवाल्यांची उतरली

फोडले ड्रम , फुटल्या बाटल्या; अकलूज पोलीसांच्या कारवाईने हातभट्टीवाल्यांची उतरली

एकमत ऑनलाईन

अकलूज – हातभट्टीच्या गुत्त्यांवर अचानक अकलूज पोलीसांनी घेराव घातला. अवैधरीत्या बनवलेली व मानवी आरोग्यास घातक असलेली हातभट्टीची दारु जागेवरच पकडली यावेळी दारु विकणाऱ्यांसह पिणाऱ्यांचीही उतरली, पळापळ झाली, ड्रमसहित बाटल्याही फुटल्या.

 

मानवी आरोग्यास घातक असणारी, रसायन मिश्रीत दारु अकलूज व परिसरात जोमाने विकली जातेय याची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी स.पो.नि. यमगर, पोहेकाॕ. सुहास क्षीरसागर, जमीन शेख, संतोष घोगरे, मंगेश पवार, पोना. शिवाजी जाधव, राहुल वाघ, नवनाथ सोनटक्के, पोकाॕ. मनोज शिंदे, संदेश रोकङे यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

हातभट्टी विक्री करणारे आरोपी अन्वर फक्रुद्दीन इनामदार रा. वङारगल्ली-अकलुज, जनाबाई कृष्णा भगवे, बाळाबाई शिवाजी भगवे रा. भगवेवस्ती-विझोरी, सतिश नागराज अङगळे रा. निरामाईनगर-अकलुज, निर्मला माणिक कळे रा. चारवस्ती-माळीनगर, संतोष बबन पराङे रा. संगम, बाळु तुकाराम कांबळे रा. प्रकाशनगर-बोरगाव, अन्वर सरवर तांबोळी रा. जुना बाजारतळ-अकलूज या आरोपींच्या ताब्यातुन ६५ लिटर हातभट्टी दारु, १५ संञा बाटल्या, २ हजार लिटर रसायन, ४ नवसागर रसायनाच्या कांङ्या, गुळ मिश्रीत रसायन ४०० लिटर असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन रसायन जागिच नष्ट करण्यात आले. आरोपींवरती भारतिय दंङ संहिता १८३६० कलम ३२८, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ई प्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मोहीम उघडलीय
अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर जबरी कारवाई करण्यात येणार आहे. मानवी जिवीतास घातक असलेली रसायने वापरुन स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे प्राण धोक्यात आणणाऱ्यांवर मोठे गुन्हे दाखल करणार आहोत. अकलुज पोलीसा ठाण्याच्या हद्दीत हातभट्टीचा थेंबही विक्री करु दिला जाणार नाही.
भगवान निंबाळकर-पोलीस निरीक्षक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या