पंढरपूर /प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या बुंदी लाडू प्रसाद निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिकरित्या पात्र झालेल्या ४ निविदांचा दर गेल्या १ वर्षापासून उघडला नसल्याने संशायस्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ही प्रक्रिया जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत करावी असा अर्ज सुर्वणक्रांती महिला उद्योग व रोजगार सेवा सहकारी संस्थेच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याची माहीती अॅड. दत्तात्रय खडतरे यांनी दिली.
बुंदी लाडू प्रसाद निविदा प्रक्रीया गेल्या १५ महिन्यापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या मार्फत सुरु आहे. एका वर्षापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी निविदा धारकांना बोलावून बैठक घेतली होती. त्यामध्ये काही निविदाधारकांनी कागदपत्रे दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. ती देण्यात आली होती. याबाबत विधी व न्याय विभागाने तब्बल ६ महिन्यांनी निवीदा प्रक्रिया अटी शर्ती प्रमाणे व मेरीट नुसार राबवावी असे निर्देश दिलेले आहेत. मार्गदर्शन प्राप्त होवून आता ६ महिने होऊनही विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीने काहीही निर्णय घेतला नसल्याने बुंदी लाडू प्रसाद निवादा प्रक्रिया संशायस्पद झाल्याची तक्रार जिल्हा व सत्र न्यायालयात एडवोकेट दत्तात्रय खडतरे यांनी केली आहे.