24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeसोलापूरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद ; साडेआठ लाखांचा ऐवज जप्त

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद ; साडेआठ लाखांचा ऐवज जप्त

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा अपार्टमेंटममध्ये घरफोडी करर्णा­या आरोपीस पोलिसांनी गजाआड केले.त्याने तब्बल ८ गुन्ह्यांची कबुली दिली असून,त्याच्याकडून सुमारे रोख रकमेसह साडेआठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.आनंद कृष्णहरी कोडम (वय-४५,रा. वजे्रश्­वर नगर,अक्कलकोट रोड) असे आरोपीचे नाव आहे.

जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील रविवार पेठेतील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये महिन्यापूर्वी भरदिवस घरफोडी झाली होती.५० हजारांचे दागिने चोरीला गेल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली होती.इरम्यान,२ सप्टेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.नि. अल्फाज शेख यांना चोरीचे दागिने विक्रीसाठी आनंद कोडम सराफ बाजारात येणार असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी साफळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जेलरोड पोलिस ठाणे हद्दीत ७ आणि एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत १ अशा ८ घरफोडी केल्याचे कबूल केले.

वरील सर्व गुन्हात ८ लाखांचे दागिने आणि साडेतीन लाख रोख रक्कम चोरीला गेले होते.त्यापैकी साडेसात लाखांचे दागिने आणि रोख एक लाख जप्त करण्यात आले आहेत.ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.नि.अल्फाज शेख,स.फौ.शैलेश सातपुते, निलेश पाटील,राहुल दुधाळे,रमेश गवळी,अय्याज बागलकोटे,सारंग लिगाडे,आबाजी सावळे,नागेशंिसह चव्हाण,विशाल बनसोडे,अमृत सुरवसे,विकी राठोड, श्रीधर काळे,सोमशेखर उडगी,अमिन शेख आदींनी केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या