सोलापूर – वसंतविहार भागातील बनशेट्टी अप्पा नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी सुनील रामचंद्र निलवाणी (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी निलवाणी हे जाम मिलमधून निवृत्त झाले आहेत. २ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता ते घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी गणपती पुळे व
रत्नागिरी येथे गेले होते. तेथून ते ५ फेब्रुवारी रोजी सोलापुरात आले. तेव्हा त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता आतील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. बेडरुममधील कपाटातून चोरट्यांनी ६० हजारांची रोकड, ४५ हजारांच्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची नथ, सोन्याचा झुबे सोन्याची नथ, सेट, चांदीच्या वस्तू असा सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला असल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक कसबे हे करीत आहेत.