25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeसोलापूरडुप्लीकेट रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीचा पर्दाफाश; बार्शी तालुक्यातील घटना

डुप्लीकेट रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या टोळीचा पर्दाफाश; बार्शी तालुक्यातील घटना

एकमत ऑनलाईन

बार्शी: देशभरामध्ये रेमडीसीवीर या इंजेक्शनचा तुटवडा असून,अनेकांना प्रयत्नांची पराकाष्टा करून देखील इंजेक्शन वेळेवर मिळत नाही.मात्र दुसरीकडे रेमडीसीवीर या इंजेक्शनचा देशभर काळाबाजार सुरु आहे.बार्शी तालुक्यामध्येही रेमडीसीवीरचा काळाबाजार करणारी टोळी समोर आली आहे.दि.१२ मे रोजी बार्शी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांना शहरात ज्यादा दराने रेमडीसीवीर औषध विकत असल्याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ड्रग इन्स्पेक्टर नामदेव भालेराव यांना बोलवून १)अमित सुभाष वायचळ रा.जावळी प्लॉट,२)निखिल राजकुमार सगरे रा.बळेवाडी,३)विकास काशीनाथ जाधवर रा.जवळी प्लॉट,४)भैय्या इंगळे रा.येडशी चौघांविरोधात भादवि कलम-४२०,३४ सह वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

अधिक माहिती अशी की,राऊत चाळ येथील महेश शामराव पवार यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना रेमडीसीवीर इंजेक्शनची गरज होती.त्यावेळी महेश याला समजले की निखिल सगरे हा व्यक्ती रेमडीसीवीर इंजेक्शन ब्लॅकने विकत आहे.त्यानंतर पवार आणि सगरे यांच्यात मित्रामार्फत बोलणे झाले व दोन इंजेक्शनचीकिंमत ५० हजार रु.ठरली.त्यानंतर सगरे याने कॅन्सर हॉस्पिटल येथे दोन इंजेक्शन आणून दिले.त्यानंतर पवार यांनी इंजेक्शनवर असलेलेल्या टोल फ्री नंबरवर फोन लावल्यावर नंबर अवैद्य सांगितला.त्यामुळे पवार यांना इंजेक्शन डुप्लीकेट असल्याचा संशय आला.त्यानंतर पवार यांनी सगरे यांना इंजेक्शन परत घेण्याचे सांगितले.

त्यानंतर सगरे याने सदरची इंजेक्शन हे अमित वायचळ यांच्याकडून आणली असून पवार यांची भेट वायचळशी घालून देऊन १५ हजार मिळवून दिले मात्र ३५ हजार देण्यास टाळाटाळ करून वायचळ यांनी हे इंजेक्शन भैय्या इंगळे,विकास उर्फ बप्पा जाधवर यांच्याकडून आणली असून त्यांच्याकडून पैसे घेऊन देतो असे सांगितले.त्यानंतर दोन दिवसामध्ये राहिलेले ३५ हजार रोख दिल्याने पवार यांनी पीएसआय अमोल ननवरे यांना सर्व हकीकत सांगितली.ननवरे यांनी पोलिस निरीक्षक गिरिगोसावी यांची भेट घालून देऊन पुढची करवाई करण्यात आली.

पुण्यात मांजरीजवळ होणार भारत बायोटेकचा प्रकल्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या