29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeसोलापूरजुनी पेन्शन साठी नेमलेले समितीच्या आदेशाची होळी

जुनी पेन्शन साठी नेमलेले समितीच्या आदेशाची होळी

एकमत ऑनलाईन

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या निवडीच्या पत्राची होळी करण्यात आले तसेच या होळीच्या भोवती बोंब ठोकली. त्या समितीच्या निषेध करण्यात आला .

जिल्हा परिषदेच्या आवारात बुधवारी शासकीय कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी व कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी संपाचा दुसरा दिवस पाळण्यात आला या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिला कर्मचारी अश्विनी शिंदे, उषा भोसले, सविता मिसाळ, आरती माडेकर, राजश्री कांगरे, भारती चव्हाण, सुनिता भुसारे, फर्जाना शेख, सुचिता जाधव, अश्विनी घोडके, अंजली पाटील, श्रीमती रांजणे, काळे , मंजिरी घोडके, छाया क्षीरसागर, अनिता तुपारे, अंजली पेठकर, ज्योती लामकाणे, ममता काशेट्टी, मृणालिनी शिंदे, श्रीमती पंगुलवाडे, सुजाता कांबळे, ज्योती काटकर, अनुपमा पडवळे, नंदा तरटे, शमा तांबोळी, रेखा राजगुरू, स्वपर्णिका ंिलगराज, लक्ष्मी शिंदे, अंजली पेठकर, प्रज्ञा कुलकर्णी, अंजली पाटील, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, गिरीष जाधव, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, एस पी माने, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अंनिल पाटील, आप्पाराव गायकवाड, उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करा, मागास वर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे अशा विविघ मागण्यांचा आक्रोश करणेत आला. गोलाकार पध्दतीने उभे राहून कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करणे साठी नेमणेत आलेल्या समितीची होळी करणेत आली. बक्षी समितीने केलेल्या शिफारशी यापुर्वीच कर्मचारी यांचेवर अन्याय करणारे आहेत. पुन्हा बक्षी यांना समितीवर घेतले मुळे कर्मचारी यांचे मध्ये संतापाची लाट होती.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या