30.4 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeसोलापूरइसमाचे मृत्यूस कारणीभूत प्रकरणी कार मालकाची निर्दौष मुक्तता

इसमाचे मृत्यूस कारणीभूत प्रकरणी कार मालकाची निर्दौष मुक्तता

एकमत ऑनलाईन

सोलापूर : डी मार्ट, रुपाभवानी रोड येथे हायवेवर कारने पादचार्‍यास धडक देऊन अपघातात मृत्यूप्रकरणी आरोपी . उमेश शहा यास आयपीसी कलम 304 अ ,279 ,337 मोटार वाहन कायदा कलम 184, 177, 185 या कलमातून सबळ पुराव्या अभावी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी . डी आर भोळा यांनी कार मालक . उमेश शहा या आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीचे वतीने विधीज्ञ अँड. श्रीनिवास कटकूर यांनी काम पाहिले आहे.

यात केसची सविस्तर हकीकत अशी की, सोलापूर मधील डी मार्ट समोरील रुपाभवानी हायवेवर दयानंद कांबळे ही व्यक्ती हायवेवरून पायी जात असताना निष्काळजीपणाने व जोरात आपल्या स्विफ्ट कारने पादचारी इसम दयानंद कांबळे यांना कारने जोरात धडक देऊन त्याच्या अपघात मृत्यूस कारणीभूत झाला याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे आरोपी उमेश शहा रा- सम्राट चौक सोलापूर वय -40 यांचेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अ, 279 ,337 मोटा वाहन कायदा कलम 177, 184, 185 या कलमान्वये अपघाती मृत्युस कारणीभूत प्रकरणे आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करुन फौजदारी खटला भरुन चार्जशीट दाखल करण्यात आला व सोबत पोलीस तपास अधिकाऱ्याने स्पॉट पंचनामा, इंनवेस्ट पंचनामा रिपोर्ट, पोस्टमार्टम रिपोर्ट ,पीएम नोट्स, मेडिकल रिपोर्ट व पंचांचे व साक्षीदारांचे जबाब व तपासणी टिपण दाखल केले व सदर केसची सुनावणी न्यायाधीश. भोळा यांच्यापुढे चालली व सरकार पक्षाकडून एकूण चार साक्षीदार व तपास अधिकारी यांना तपासण्यात आले .

याकामी आरोपी कार मालकाचे बचावार्थ युक्तीवादमध्ये सदर अपघात हा आरोपीचे कारने झालेली नसून अगोदरच कोणत्या तरी दुसऱ्या कारने धडक देऊन मयताचे मृत्यूत कारणीभूत झाला व सदर घटनेस कोणीही नेत्र साक्षीदार नाही ,असा बचाव पक्षाकडुन युक्तीवाद करण्यात आला आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्रा धरून. न्यायाधीशांनी सबळ पुरावे अभावी कार मालकाची निर्दोष मुक्तता केली यात आरोपी कार मालक उमेश शहा यांच्यातर्फे एस के लॉ असोसिएटसचे अँड श्रीनिवास कटकूर, अँड. किरण कटकूर, अँड. आकाश आयंची यांनी काम पाहिले तर सरकार पक्षाकडून अँड. वैशाली बनसोडे यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या