24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरतुळजाभवानी मंदिरात अपंग व वयोवृध्द भाविकांची हेळसांड

तुळजाभवानी मंदिरात अपंग व वयोवृध्द भाविकांची हेळसांड

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी पावन नगरीत अपंग व वयवृध्द भाविकाची हेळसांड होत आहे. गोरगरीब भाविकांना देवीचे दर्शन मिळत नसल्याने भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानला करोडो रुपयाचे आर्थिक उत्पन्न असून सुद्धा गोरगरीब अपंग व वयोवृध्द भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. अपंग, वयोवृद्ध भाविकांची मोठी हेळसांड होऊ नये म्हणून देवीच्या एका भक्तांनी मंदिर संस्थानला (ट्रेचर) खुर्ची भेट दिलेली आहे. त्या खुर्चीचा उपयोग होताना दिसून येत नाही.

मंदिर संस्थान भाविकांकडून देणगी स्वरूपात ५०० रुपये वसूल करते. त्यानंतरच वयोवृद्ध व गोरगरीब भाविकांना दर्शनासाठी सोडले जाते. मात्र ज्या भाविकांची ५०० रूपये देण्याची परिस्थितीच नाही अशा वयोवृध्द, अपंग भाविकांना त्या खुर्चीतून दर्शन घडले जात नाही. त्यामुळे स्वत: बसत उठत देवीचे दर्शन घेतता

. असाच प्रकार १६ मे रोजी पहावयास मिळाला. दुपारी वयोवृध्द भाविक पुरुष मंदिरात आले असता त्या पुरुषाजवळ पैसे नसल्यामुळे स्वत: बसत-उठत दर्शन करून येताना त्या भाविकाला त्यांच्या नातेवाईकांनी सहकार्य केले व मंदिरामधून बाहेर घेण्याची मदत केली. यावेळी मंदिरचे सुरक्षा रक्षक बघ्याची भूमिका घेत होते.

मंदिर संस्थानने अपंग, वयोवृध्द भाविकांना मंदिरात कसलीच सुखसुविधा उपलब्ध करून दिलेली दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोर्प­यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यात वयोवृद्ध महिला, पुरुष, अपंगही मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र गेट करून त्या ठिकाणी मंदिर संस्थानचा सुरक्षा रक्षक उभा करावा, जेणेकरून त्या भाविकांची गैरसोय होणार नाही, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या