सोलापूर : कारखान्यातील तरुण वार्परच्या आत्महत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिस हवालदार एस. के चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन करुणा रमेश गज्जम, भूलक्ष्मी देविदास चन्ना, देविदास विजय चन्ना, कविता प्रसाद कन्नम, महेश रमेश गज्जम, गणेश विजय चन्ना, जयेश संगा, रोहित जन्नू व साईनाथ पोला या नऊजणांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत किरण रमेश गज्जम (वय ४०, रा. गांधीनगर, अक्कलकोट रस्ता ) यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून संशयित आरोपींनी संगनमत करून घर दुरुस्तीला दिलेले पैसे व घर दुरुस्त बांधकाम रद्द झालेले पैसे कोणाला परत देत नसतो असे किरण यांना सांगितल्यावर त्यांनी गोंधळे वस्ती येथील राठी कारखान्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामध्ये अद्याप कोणालाही अटक झाली नाही.