22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeसोलापूरधर्मवीर संभाजी तलावात बोटिंगसाठी खंडणी मागणा-यावर गुन्हा दाखल

धर्मवीर संभाजी तलावात बोटिंगसाठी खंडणी मागणा-यावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : येथील धर्मवीर संभाजी तलावातील बोंिटग व्यवसाय करायचा असेल तर दहा हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी व्यावसायिकाला दिल्याप्रकरणी रोहन जाधव (रा. सेटलमेंट कॉलनी, याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस सूत्रांनुसार, बोंिटग व्यवसाय करणारे जुबेर इक्बाल शेख (वय २६, रा. दोन नंबर झोपडपट्टी, विजापूर रोड) यांनी फिर्याद दिली. त्यावरून रोहन जाधव (रा. सेटलमेंट फ्री कालनी सोलापूर) याच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धर्मवीर संभाजी तलावात अलीकडच्या काळात बोंिटग व्यवसाय सुरू झाला आहे. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रोहन जाधव तेथे आला. बोंिटगसाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी आरोपी रोहन विनातिकीट थेट बोंिटगच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी त्याने वाटेतील पर्यटकांना ढकलाढकली केली.

फिर्यादी जुबेर आणि सुरक्षारक्षक श्रीनिवास परदेशी यांनी संशयित आरोपी रोहन यास थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सय्यद अजमोद्दीन, सद्दाम काझी, अरबाज काझी, आयाज जमादार, रोहित येडगे, खिजर मकानदार आणि आदील मौलवी यांनी रोहनकडे तिकिटाबद्दल चौकशी केली. त्यावर त्याने शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

बोंिटगच्या ठीकाणी गोंधळ घातल्यानंतर संशयित आरोपी रोहन तिकीट खिडकीजवळ आला, तेथे त्याने खिडकी उघड व मला दहा हजार रुपये दे अशी मागणी केली. फिर्यादीसह इतरांना बघून घेण्याची धमकी दिली. याठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल, असेही बजावले. दरम्यान, तेथे पोलिस आल्याने त्याने पळ काढल्याची नोंद पोलिसांत झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या