प्रतिनिधी/टेंभुर्णी
सोलापूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील मोडंिनब येथे हिन्दुस्थान पेट्रोल पंपाजवळ अन्न,औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिका-यांनी अवैधरित्या गुटखासदृश्य पानमसाला, सुगंधी तंबाखू घेऊन जाणारा एक टेम्पो पकडला असून या टेम्पोतून सुमारे साडेबेचाळीस लाख रूपयेकिंमतीचा गुटखा, पानमसाला व दहा लाख रूपयेकिंमतीचा टेम्पो, असा साडेबावन्न लाख रूपयेकिंमतीचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून टेम्पो चालक व मालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. चालकास टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) ए. वाय. इलागेर यांना एमएच १३ / सीयु २६०२ हा टेम्पो मोडंिनब येथील हिन्दुस्थान पेट्रोल पंपावर बिघाड झाल्यामुळे थांबला असून त्यामध्ये गुटखासदृश्य पानमसाला असल्याची गोपनीय माहिती समजली. त्यामुळे सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ, ए. वाय. इलागेर या दोघांनी मोडंिनब येथे येऊन बंद असलेल्या टेम्पोच्या चालकास टेम्पोतील मालाविषयी विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये पानमसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा असल्याचे आढळून आले.
या टेम्पोमध्ये राजनिवास सुगंधित पानमसाला ८५ मध्ये दोनशे रूपयेकिंमतीच १७ हजार पाकिटे एकूणकिंमत ३४ लाख रूपये तसेच एक्सएल ६१ जाफरानी जर्दा १७ पोत्यामध्ये ५० रूपयेकिंमतीची १७ हजार पाकिटे एकूणकिंमत साडेआठ लाख रूपये, असा एकूण ४२ लाख रूपयेकिंमतीचा माल अन्न सुरक्षा अधिका-यांनी पकडला. टेम्पोतील माल जप्त करून घेऊन गेले. तसेच १० लाख रूपयेकिंमतीचा टेंम्पो व चालक तुकाराम हणुमंत वस्के (वय ३२ रा. आलूर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) यास टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी नंदिनी हिरेमठ यांनी चालक तुकाराम वस्के व मालक महकदिप बलदेव सिंग (कल्पतरू इस्टेट; जवळकर नगर ंिपपळे गुरव, पुणे) या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले हे करीत आहेत.