16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeसोलापूर‘त्या’ ठरावामध्ये सीईओ स्वामी यांनी घातले लक्ष

‘त्या’ ठरावामध्ये सीईओ स्वामी यांनी घातले लक्ष

एकमत ऑनलाईन

सोलापूर : कुमठे येथील जिल्हापरिषदेची शाळा आणि क्रीडांगण भाडे तत्वावर देण्याच्या ठरावावर सीईओ दिलीप स्वामी यांनी लक्ष घातल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. सर्वसाधारण सभेत भाडे तत्वावर देण्याचा ठराव एकमताने मंजूर केल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र या ठरावावर प्रस्ताव दाखल करणारे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड आणि सभागृहसचिव डेप्युटी सीईओ परमेश्वर राऊत यांच्या सह्या नसल्याने हा ठराव कोंडीत सापडला आहे. ग्रामपंचायत विभागाने ठराव मंजूर दाखवून जागा हस्तांतर करण्यासाठी टिपणी दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर अर्थ विभागाने मूल्यांकन करून सभागृहाने विचार करावा, असे सूचित केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कुमठे येथील शिक्षण प्रसारक मंडळाने झेडपीच्या शाळेची इमारत व क्रीडांगण करारावर भाड्याने मागितले होते. दोन वेळा झेडपीच्या सभेत हा प्रस्ताव आला. सदस्य सुभाष माने व ऍड. सचिन देशमुख यांनी झेडपीच्या शाळा बंद पाडायच्या अन नाममात्र दराने मोक्याच्या जागा भाड्याने द्यायच्या हा अधिका-यांचा उद्योग असल्याची टीका केली होती. त्यामुळे सभेत गोंधळ झाला होता.

सदस्यांनी विरोध केल्यावर दोन्हीवेळा हा विषय फेटाळण्यात आला होता. पण प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सभेत हा विषय मंजूर झाला आहे. तसे प्रोसेंिडग शिक्षण विभागाकडे आल्याने शाळा भाड्याने देण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ही बाब त्यांच्या नजरेला आली. झेडपी शाळांच्या जागा भाड्याने देण्याचा विषयावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

२१ नोव्हेंबर २0१९ रोजी जिल्हा परिषदेची सभा उपाध्यप शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. पाटील यांनी या सभेचे प्रोसेंिडग मंजूर केले. त्यात ही शाळा भाड्याने देण्याच्या ठरावाला मंजुरी दिल्याची फक्त त्यांनीच सही केली. सूचक सुभाष माने तर अनुमोदक नितीन नकाते यांची नावे आहेत पण त्यांच्या सह्या नाहीत. सभेत विषयाला विरोध झाल्याने अधिका-यांनी यावर सह्या केलेल्या नाहीत.

उपमुख्यमंत्र्यांनी केली विचारणा
कुमठे येथील जिल्हापरिषद शाळा आणि क्रीडांगण भाडे तत्वावर देण्यासाठी माजी सीईओ प्रकाश वायचळ यांना फोन करून विचारणा केली होती. सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून शासन स्तरावर पाठवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली होती. त्या अनुषंगाने हा ठराव मंजूर दाखवण्यात आला. ज्या सदस्यांनी सभागृहात विरोध दर्शवला होता त्यांनाच सूचक अनुमोदक केल्याची बाब निदर्शनास आल्याने सीईओ दिलीप स्वामी यांनी या प्रकरणावर लक्ष घातले असून अतिक्रमण जागा आणि जि.प. च्या मालकीच्या जागांची माहिती मागवली आहे.

ईश्वर चिठ्ठीने केल्या अनेकांच्या अपेक्षा भंग ; हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण सोडत संपन्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या