24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरअध्यक्षांसह सदस्यांना सेसफंडाची दमडी

अध्यक्षांसह सदस्यांना सेसफंडाची दमडी

एकमत ऑनलाईन

शेखर गोतसुर्वे सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील चालू कार्यरत वर्षातील ४० कोटींचा सेसफंड शिल्लक असूनही अध्यक्षांसह सदस्यांना दमडीही विकासकामांकरिता हाती आली नाही. जि.प. च्या विविध समितीचा सेसफंड प्रशासनाने रोखून धरल्यामुळे विकासकामांना फटका बसला आहे. तर आरोग्य विभागाच्या दुर्धर आजारासाठी ७० लाखांचा निधी देण्यात आला होता. यातील ३५ लाखापर्यंतचा निधी वळविण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामविकास मंत्रालय स्तरावरून सेसफंड खर्च करण्यास स्थगिती देण्यात आल्यामुळे अध्यक्षांसह पदाधिकारी सदस्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.सुमारे ४० कोटींचा सेसफंड शिल्लक असून देखील निधी खर्ची पाडण्यास हतबलता निर्माण झाली आहे. काहींच्या मते सन २०१८-१९ साठी स्थगिती असल्याचे सांगण्यात येत आहे तर काहींच्या मते सेसफंडाच्या वाटपावर स्थगिती वर्ष नमूद केला नसल्याचे म्हणणे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॅफो कार्यालयाने सर्व समितीचा सेसफंड रोखला आहे. समाजकल्याण, महिला बाल कल्याण, बांधकाम अर्थ, कृषि पशूसंवर्धन, शिक्षण, सदस्यांच्या निधी वाटपाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२० पासून अध्यक्षांसह पदाधिकाºयांनी एक रुपयाचा निधी खर्ची पाडला नाही.

निधी वाटपावरून सुरु झालेला वाद अद्यापपर्यंत मिटविण्यात आला नाही. सेसफंड स्थगितीवरून सदस्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना आपत्ती काळात सदस्यांना निधी मिळत नसल्याने ओरड होत आहे. तर इकडे आरोग्य विभागाने दुर्धर आजारासाठी असलेला निधी वळविण्याचा घाट घातला आहे. १३ फेब्रुवारी रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाचा आधार घेत ३५ लाखांपर्यंतचा निधी वळविला आहे. पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील प्राथमिक आरोग्य उभारण्याकरिता जागा खरेदीसह बांधकामासाठी २१ लाखांचा निधी दुर्धर आजाराच्या निधीतून देण्यात आल्याने आरोग्य समितीने यावर आक्षेप घेतला आहे.

आरोग्य समितीच्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार समितीसमोर विषय न आणता सर्वसाधारण सभेत विषय मांडला गेला होता. निधी वळविण्याचा ठराव सभागृहात फेटाळून लावला होता, असे सदस्यांचे म्हणणे आहे तर सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर असल्याचा लागू पुरता उतारा घेऊन निधी वळविण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सेसफंडाला स्थगिती असताना निधी वळविला कसा असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

वळविलेला निधी कोविडसाठी वापरा
दुर्धर आजारासाठी जो निधी मंजूर आहे तो निधी इतर ठिकाणी वळविला आहे. निधी वळविण्याचा ठराव मंजूर असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक पाहता असा ठराव फेटाळून लावला आहे. वळविलेला निधी कोविडसाठी वापरण्यात यावा.
निलकंठ देशमुख (जि.प.सदस्य)

Read More  खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या