31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeसोलापूरचंद्रकांतदादा देशमुख यांनी नुकसानग्रस्त गावांना दिली भेट

चंद्रकांतदादा देशमुख यांनी नुकसानग्रस्त गावांना दिली भेट

एकमत ऑनलाईन

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यामध्ये पाऊसाच्या हाहाकाराने अनेक लोकांचे संसार उघड्यावर पडले. शेतकर्यांचे तर आतोनात नुकसान झाले आहे.विशेषता डाळींब बागाच्या नुकसानीने शेतकरी पुरता खचला गेला आहे. कासाळ ओढ्याला आलेल्या पुरामुळे महुद,कटफळ,चिकमहुद,महीम गार्डी,पळशी आशा अनेक गावांना नुकसानीची झळ जास्त प्रमाणात सोसावी लागली आहे.अशा नुकसानग्रस्त महीम,गार्डी,पळशी या गावांना शेकापक्षाचे नेते मा. भाई चंद्रकांतदादा देशमुख यांनी भेट देऊन दिली व शेतकर्यांच्या व सामांन्य नागरीकांच्या भावना समजाऊन घेतल्या.

ज्या शेतकऱ्यांच्या ऊभ्या पिकांचे व घरांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची माहीती घेतली. सोलापुर जिल्ह्याच्या पालकमंत्रांना माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांनी नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन योग्य मदत द्यावी अशी विनंती केल्याचे दादांनी सांगीतले.व पालकमंत्र्यांनीही योग्य ती मदत करण्याचे आश्वासन आबासाहेबांना दिल्याचे सांगण्यात आले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना व नागरीकांना बोलताना चंद्रकांतदादा देखमुख म्हणाले की, आम्ही पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातुन तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री साहेबांना ही निवेदन दिले आहे.जर का सरसकट पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना योग्य मदत न मिळाल्यास शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना रस्त्यावर उतरुन लोकशाही मार्गने आंदोलन करु व मदत मिळवुन देण्याचे आश्वासन चंद्रकांतदादा देशमुख यांनी दिले. विशेषता पळशी येथे नुकसानग्रस्त भागाला भेट देण्यासाठी एक कीलोमीटर पायी चालत सर्वजन गेले.

यावेळी नुकसानग्रस्त गाव भेटीवेळी दिपक गोडसे, हेमंत पाटील,रघुनाथ झांबरे,हनुमंत चव्हाण,आनंदा शिंदे, दिलीप(मामा)माने, सुधाकर भिंगे, सुर्यकांत ईनामदार,सत्यवान देवकुळे,सर्जेराव महारनवर ,सहदेव गोडसे इत्यादी मान्यवर उपस्थीत होते.

डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटावर राज ठाकरेंनी केला कौतुकाचा वर्षाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या