22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसोलापूरपुरातत्व विभागाच्या सूचनेप्रमाणे विठ्ठल मंदिरात होणार बदल

पुरातत्व विभागाच्या सूचनेप्रमाणे विठ्ठल मंदिरात होणार बदल

एकमत ऑनलाईन

पंढरपूर / प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाच्या टीमने विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पाहणी केली होती. याबाबत मंदिर समितीस अहवाल प्राप्त झाला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीमध्ये पुरातत्व विभागाच्या सूचनांचे पालन केले जाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी सांगितले.

यामध्ये विठ्ठल मंदिरातील गाभा-यातील मार्बल काढण्यात येणार असून आषाढी वारी पूर्वी रुक्मिणी मातेच्या मुर्तीस वज्रलेप केला जाणार आहे. तसेच पदस्पर्श दर्शन दीर्घकाळ सुरू ठेवायचे असेल तर दर पाच वर्षांनी वज्रलेप करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने मंदिर समितीला दिले आहेत. तसेच मंदिरातील फुलांची सजावट ही सण व उत्सवादरम्यान केली जाणार आहे. याच बरोबर आषाढी यात्रेच्या महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार आहे.तसेच मंदिर सुरू होऊन सहा महिने झाली तरी टेंडर प्रक्रियस उशीर होत असल्याने भाविकांना लाडू प्रसाद मिळत नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत आषाढी यात्रेपूर्वी भाविकांना लाडूचा प्रसाद उपलब्ध करून देणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

याबाबत सुवर्ण क्रांती महिला उद्योग समूहाचे सल्लागार एडवोकेट दत्तात्रय खडतरे यांनी टेंडर प्रक्रियेमध्ये दिरंगाई होत असल्याने भाविकांना बुंदी लाडू प्रसाद त्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे म्हटले आहे.याबाबत निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक रित्या पात्र असलेल्या निवीदांचा दर गेल्या एक वर्षांपासून उघडला नसल्याने निविदा प्रक्रिया या उपस्थित निविदा धारकांच्या समक्ष मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासमोर करण्याची मागणी खडतरे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्याचे विधी व न्याय खात्याचे सचिव तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या