20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeसोलापूरसीसीएच प्रकरणात फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी : पोलिस निरीक्षक बहिरट

सीसीएच प्रकरणात फसवणूक झालेल्यांनी तक्रार करावी : पोलिस निरीक्षक बहिरट

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सीसीएच अ‍ॅप फसवणूक प्रकरणातील लोकांची चौकशी सुरु आहे. एजंटांचीही चौकशी सुरू आहे. तक्रार करण्यासाठी लोकांनी पुढे यावे. कोणालाही घाबरू नये. ज्यांना तक्रार द्यायची आहे, त्यांनी पोलिस आयुक्तालयात येऊन जबाब द्यावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलिस तथा निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी केले आहे.

सीसीएच अ‍ॅप फसवणूक प्रक रणातील येरंकल्लू बंधूंना पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली असून पोलिस आयुक्तालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी येरंकल्लूला नोटीस बजावली होती. रविवारी सकाळी अकरा वाजता हजर राहण्याची नोटीस होती. परंतु, येरंकल्लू बंधूंपैकी कोणीही आयुक्तालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिस आता विशेष यंत्रणेद्वारे येरंकल्लू बंधूंचा शोध आहेत. त्यासोबत ‘सीसीएच’च्या साखळीचाही शोध सुरू आहे.
सीसीएच अ‍ॅप फसवणूक प्रकरणाचा तपास आता गुंतागुंतीचा बनला असून फसवणुकीतील सर्व व्यवहार अ‍ॅपवर झाल्याने तपास करताना पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

येरंकोल्लू बंधू गायब असल्याने तपासांत अडथळा निर्माण झाला आहे, दुसरीकडे तक्रार देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, सीसीएच प्रकरणातील प्रत्येकाचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासोबत या अ‍ॅपवर जर कोणी पैसे गुंतविले किंवा गुंतविण्यासाठी दुसऱ्यांना प्रोत्साहन केले, अशा सर्वांची पोलिस चौकशी करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या