22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeसोलापूरसोलापूर ग्रामीणमधील मुलांनी मारली बाजी

सोलापूर ग्रामीणमधील मुलांनी मारली बाजी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०१९ चे निकाल जाहीर केला आहे. सोलापूर ग्रामीण भागातील मुलांनी बाजी मारली आहे. सोलापूर जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे.

यूपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. पंढरपूर मधील राहुल लक्ष्मण चव्हाण तसेच अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांची यूपीएससी परीक्षेत यश मिळवत आयएएससाठी निवड झाली आहे. तर माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील अश्विनी तानाजी वाकडे हिने २०० वा रँक मिळवला आहे. अक्कलकोटमधील शिवकुमार कापसे रँकमध्ये २४९ क्रमांकावर आहेत.

यूपीएससी परीक्षेत पंढरपुरातील विद्यार्थ्यांची बाजी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण आणि कासेगाव येथील अभयंिसह देशमुख यांनी यश संपादन केले आहे. तालुक्यातील खर्डी येथील राहुल चव्हाण यांना यूपीएससी परीक्षेत १०९ वा रँक मिळाला आहे. तर कासेगावच्या अभयंिसह देशमुख यांना १५१ वा रँक मिळाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही युवकांचे शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे पंढरपुरातच झाले होते.

यामध्ये खर्डीचे चव्हाण हे तिस-या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. तर देशमुख यांचा हा यूपीएससी परीक्षेचा तिसरा प्रयत्न होता. विशेष म्हणजे देशमुख तीनही वेळा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये आता देशमुख यांना आयपीएस आणि चव्हाण यांना आयएएस केडर मिळेल आहे. चव्हाण वस्ती येथे विविध मान्यवरांची सत्कारासाठी गर्दी जमली होती.यावेळी आमदार प्रशांत परिचारक, खर्डी गावचे सरपंच रमेश हाके, उपसरपंच प्रणव परिचारक यांनी त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वाघोलीचा सागर भारत मिसाळ
वाघोली गावाची क्लास वनची परंपरा खंडित न करता पुढे वारसा चालू ठेवण्याचं काम सागर मिसाळ वयाच्या 24व्या वर्षी (भारतात २०४ क्रमांक) यांनी केले. सागर भारत मिसाळ चे प्राथमिक शिक्षण वाघोली मधील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण विजयंिसह मोहिते विद्यालय वाघोली येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय येथे झाले. त्याची घरची परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि या परिस्थिशी सामना करत त्याने हे यश संपादन केले आहे. वडील शेती तर आई गृहिणी आहेत. त्यांचे गावातील सर्व नागरिक यांनी अभिनंदन केले. गावात आंदोस्तव साजरा करण्यात आला तोफा उडवण्यात आल्या.

मंगळवेढ्याचा श्रीकांत खांडेकर
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात २३१ व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या वडिलांनी तीन एकर जमिन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्टर होण्याचे ध्येय पूर्ण केले. दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या बावची गावात जिरायत शेतीत केलेलाखर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करून जगणा-या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी स्वत: अशिक्षित असूनही आपल्या तीन मुलांना शिक्षित केले. थोरल्या मुलाने मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार मिळवला आणि दुसरा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तिस-या मुलाचे पदवीचे शिक्षण सुरु आहे.

उपळाई बुद्रुक अश्विनी वाकडे
अधिका-यांचे गाव अशी राज्यात ओळख असलेल्या उपळाई बुद्रुक गावात अजून एक अधिर्का­याची भर पडली आहे. निवृत्त पोलिस कर्मचा-याच्या मुलींने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत माढा तालुक्यातील (बोकडदरवाडी) उपळाई बुद्रूक येथील अश्विनी तानाजी वाकडे यांनी २०० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे. आई वडिल भाऊ बहीण यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे. अपयश आले तरी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करा यश नक्की मिळते, असे अश्विनी वाकडे यांनी सांगितले.

बार्शीचा अजिंक्य विद्यागर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालो. पण जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्यामुळे युपीएससीची तयारी सुरुच होती. शिक्षण सुरु असताना दोन वेळा युपीएससी परीक्षा दिली पण यश आले नाही. आता तिस-या प्रयत्नामध्ये मात्र यश प्राप्त झाल्याचे बार्शी येथील अजिंक्य विद्यागर यांनी सांगितले.

बार्शी चुंबचा अविनाश जाधवर
माझ्या गावाचे नाव देशात रोशन झाले पाहिजे, खूप अभ्यास करीन पण जिल्हाधिकारी होणारच अन् स्वप्न पूर्ण करणारच, अशी जिद्द ठेवली आणि यशस्वी झालो. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागील वर्षात २०२९ मध्ये घेतलेल्या परीक्षेत ४३३ रँकने जिल्हाधिकारी झालेल्या अविनाश जाधवर यांनी सांगितले.

अक्कलकोटचा योगेश कापसे
अक्कलकोट येथील योगेश कापसे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या झालेल्या परीक्षेत २४९ रँकने यस मिळवून अक्कलकोट तालुक्यात अभिनंदनास पात्र ठरला आहे. मंगळवारी निकाल जाहीर झाला आणि त्यात त्याने २४९ वे रँक प्राप्त केले.

माढ्याचा निखिल अनंत कांबळे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने जून २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत माढा येथील निखिल अनंत कांबळे (माढेकर) यांनी 744 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत घवघवीत संपादन केले आहे. यापूर्वी जिल्ह्यातून अनेक आयएएस, आयपीएस आणि एमपीएससी अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत सेवा बजावत आहेत.

Read More  आयोध्येतील राम मंदीर भुमीपूजन सोहळा दिवाळीसारखा साजरा करा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या