19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरपंढरपूर पोलिसांमुळे गाव सोडून गेलेली मुले ८ तासांत पालकांच्या ताब्यात

पंढरपूर पोलिसांमुळे गाव सोडून गेलेली मुले ८ तासांत पालकांच्या ताब्यात

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : पंढरपुरातील अल्पवयीन दोन मुले कामाच्या शोधासाठी घरातील सदस्यांना न सांगताच रविवारी सकाळी रेल्वेने पुण्याला निघाली. ही बातमी समजताच त्या मुलांच्या आईच्या डोळ्यातील अश्रु सुरू झाले अन् पोलिसांच्या मदतीने आठ तासांनंतर मुले ताब्यात मिळाल्यानंतरच तिचे अश्रू थांबले. पंढरपुरातील १३ व ११ वर्षे वयाची दोन मुले रविवारी सकाळी रेल्वेने कामाच्या शोधासाठी पुण्याला म्हणून रेल्वेत बसून निघाली होती. जाताना त्यांनी सोबत घरातील मोबाइल घेतला होता.

पंढरपूर सोडल्यानंतर त्या मुलांनी घरी फोन करून आईला सांगितले की आम्ही कामासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी निघालो आहोत एवढे सांगितल्यानंतर त्यांनी मोबाइल फोन बंद केला. मुलांच्या आईला काय करावे समजेना. त्या खूप हवालदिल झाल्या प्रथम त्यांनी मुलांचा शहरात शोध घेतला नातेवाईक आणि त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली. फोन बंद ठेवल्याने त्यांचा नेमका ठावठिकाणा लागत नव्हता.

मुलांचे पालक प्रचंड घाबरून गेले होते. यावेळी त्या मुलांच्या शेजारीच राहत असलेल्या संध्या चंद्रकांत पिटले यांनी मुलांच्या आईसह शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांच्या समोर झालेला प्रकार सांगितला. त्या मुलांकडे असलेला मोबाइल बंद असल्याने पोलिसांना ते नेमके कुठे असतील याचा शोध घेणे आव्हानात्मक वाटू लागले होते. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुजीत जाधव, सूरज हेबाडे, अन्दर आतार यांच्या पथकाने तातडीने मोबाइलचे लोकेशन शोधले. ते लोकेशन कुर्डुवाडी येथे दिसून आले.

पोलिसांनी तातडीने कुर्डुवाडी पोलिस आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांचे वर्णन सांगून फोटोही पाठवून दिले. तेव्हा पोलिसांना ती दोन्ही मुले रेल्वे स्थानकावर दिसून आली. त्याना लगेच ताब्यात घेऊन पोलिसानी त्याचे समुपदेशन केले.’ पालक कुर्डुवाडी येथे गेले, मुलांना पाहताच पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि मुलांना घेऊन आले. पंढरपूर शहर पोलिसांनी त्या मुलांचे समुपदेशन केले आणि सायंकाळी ७ वाजता ती मुले सुखरूप घरी परत आली. पंढरपूर पोलिसानी उत्काळ केलेल्या तपासामुळे ८ तासांत ती सुखरूप पालकांना मिळाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या