सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ होती. ५९० ग्रामपंचायतीमध्ये एकुण १२ हजार २२५ उमेदवारांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावली होती. यातुन ५९० गाव कारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडुण येणार आहेत. दुपारी ३ वाजेपर्यंत ७०.१० टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली होती. मतदान प्रक्रिया शांत आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने चोख प्रयत्न केले.
एकुण १८ हजार अधिकारी व कर्मचारी यासाठी कार्यरत होते. एकूण २ हजार २९६ प्रभागात निवडणुक झाली. यात ३ हजार ४७५ महिला उमेदवार देखील नशीब आजमावणार आहेत. दुपारी ३.३० वाजता करमाळा ७०.६८ टक्के, माढा ७१ टक्के, बार्शी ६८.७९ टक्के, उत्तर सोलापूर ६६.९८ टक्के, माळशिरस ६७.३० टक्के, सांगोला ७०.४९ टक्के, मंगळवेढा ६९.०७ टक्के, दक्षिण सोलापूर ६८.८५ टक्के, अक्कलकोट ६८.६६ टक्के एकुण ७०.१० टक्के एवढे मतदान दुपारी ३.३० पर्यंत झाले होते.
एकनाथ खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी !