27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeसोलापूरउळे गावात चोरट्यांची हातसफाई, सोन्या चांदीचे दागिने लंपास

उळे गावात चोरट्यांची हातसफाई, सोन्या चांदीचे दागिने लंपास

एकमत ऑनलाईन

सोलापूर : उळे (ता. द. सोलापूर) गावात अज्ञात चोरट्यांनी दोन घरात चोरी केली. या घटनेत चोरट्यांनी ६८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवार ४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

ज्ञानेश्वर रमेश भोसले (३१, रा. उळे, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी ज्ञानेश्वर भोसले यांचे कुटुंबीय ३ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून झोपले होते. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. याशिवाय अविनाश भगवान मुळे यांच्याही घरातील १० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. उळे गावातील चोरीत १७ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम सोन्याचे गंठन, १५०० रुपये किमतीचे सोन्याची अंगठी, १७ हजाराचे सोन्याचे कर्णफुले व झुबे, ३०० रुपयाचे पायातील चांदीचे जोडवे, पैंजण, सोन्याची नथ, सोन्याच्या रिंगा व रोख रक्कम असा एकूण ५८ हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या