26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरलाच स्वीकारल्याप्रकरणी लिपिक निर्दोष

लाच स्वीकारल्याप्रकरणी लिपिक निर्दोष

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तक्रारदाराच्या शेतजमिनीची बिगरशेती करण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपातून अशोक सिद्राम सोनकांबळे (रा. होटगी रोड, सोलापूर) यांची विशेष न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी निर्दोष मुक्तता केली.

तक्रारदार नागेंद्र आलुरे (रा. गोगाव, ता. अक्कलकोट) यांनी शेतजमीन बिगरशेती करण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी ४० हजार रुपये लाच मागत असल्याबाबत तक्रार केली होती. २६ नोव्हेंबर २०२० रोजी भूमी अभिलेख कार्यालय, अक्कलकोट येथे सापळा रचून चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणी अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

आरोपीतर्फे अ‍ॅड. सुरेश पाटील कुरूलकर, अ‍ॅड. राजकुमार पाटेकर, अ‍ॅड. समाधान दळवे तर सरकारतर्फे अ‍ॅड. लक्ष्मण राठोड, अ‍ॅड. नागनाथ गुंडे यांनी काम पाहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या