35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home सोलापूर आ. सुभाष देशमुखांनी बांधली चक्क महिला पोलिस उपायुक्तांना राखी

आ. सुभाष देशमुखांनी बांधली चक्क महिला पोलिस उपायुक्तांना राखी

एकमत ऑनलाईन

सोलापूर  : कोरोना संकटाच्या काळात आ. सुभाष देशमुख यांनी दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचा सण मोठा साजरा न करता अनोख्या पद्धतीने साजरा केला. या काळात संपूर्ण शहरवासियांचे रक्षण करणा-या महिला पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांना स्वत: आ. देशमुख यांनी राखी बांधत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महापौरांसह अन्नपूर्णा योजनाच्या कर्मचा-यांनी आ. देशमुख यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.

दरवर्षी आ. सुभाष देशमुख रक्षाबंधन सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. संपूर्ण मतदारसंघातील शेकडो भगिनी आ. देशमुख यांना राखी बांधण्यासाठी येतात. मात्र यंदा कोराना महामारीचे संकट असल्याने आ. देशमुख यांनी सर्वांना दूरध्वनीवरून सणाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ. देशमुख यांनी अनोखा उपक्रम राबवत कोरोना काळात संपूर्ण शहरवासियांचे रक्षण करर्णा­या महिला पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी स्वत: त्यांच्या घरी जाऊन राखी बांधली आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी आ. देशमुख यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या घरीही जात राखी बांधून घेतली. तर विकासनगर येथील त्यांच्या कार्यालयात महिला कर्मर्चा­यांनी आ. देशमुख यांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.

Read More  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या