24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeसोलापूरथकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

थकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

एकमत ऑनलाईन

सोलापूर : महापालिकेची थकबाकी भरण्यासंदर्भात महापालिका आयुक्­त पी. शिवशंकर यांनी सुनावणी घेतली. त्यांच्यासाठी अभय योजनाही लागू करण्यात आली. मात्र, तरीही थकबाकी भरणा न केलेल्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई महापालिकेच्या कर संकलन विभागाने आज सुरु केली आहे. त्यात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याशी संबंधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग संघ, माजी आमदार रवि पाटील यांच्याशी संबंधित रेडिमेड दुकान, सोरेगाव येथील सुभाष पाटील यांची मालमत्ता आणि सात रस्ता परिसरातील तडवळकर फिटनेस क्­लब प्रा.लि. ची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे.

शहरातील काही मोजक्­या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. दहा लाखांवरील थकबाकीदारांची सुनावणी महापालिका आयुक्­त पी. शिवशंकर यांनी घेतली. त्यांना थकबाकी भरण्यासाठी मुदत दिली. त्यांच्याकडील शास्तीची रक्­कम माफ करीत अभय योजना लागू केली. दुसरीकडे पाच ते दहा लाखांपर्यंत थकबाकी असलेल्यांची सुनावणी उपायुक्­त जमीर लेंगरेकर यांनी घेतली. त्यांनाही थकबाकी भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांचीही मालमत्ता जप्त केली जाईल, अशी माहिती लेंगरेकर यांनी दिली.

महापालिकेची थकबाकी न भरणा-यांना सुनावणी घेऊन मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाईल. तत्पूर्वी, महापालिकेच्या कर्मचा-यांकडील थकबाकीची माहिती घेऊन पगारपत्रकासोबत त्यांना येणेबाकी नसल्याचा दाखला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या