25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसोलापूरअध्यक्ष अन् सीईओंची दिलजमाई

अध्यक्ष अन् सीईओंची दिलजमाई

एकमत ऑनलाईन

शेखर गोतसुर्वे सोलापूर : जिल्हा परिषेद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे अन् सीईओ प्रकाश वायचळ यांची दिलजमाई झाल्याची चर्चा होत आहे. गेल्या दोन दिवसापासून कर्मचा-यांच्या बदली प्रक्रिया दरम्यान मतभेद टाळून एकत्रीत येत समन्वय घडविलं आहे.उपाध्यक्ष दिलीप चव्हाण ,कृषी सभापती अनिल मोटे यांना सोबतीला घेत प्रशासन ,पदाधिकारी ,सदस्यांमध्ये पडलेल्या दरी बुजविण्याचा अध्यक्ष कांबळे यांच्या कडून प्रयत्न करण्यात आला. हा समन्वय जीबीपूर्व असल्याचे मानण्यात येत आहे.पदाधिका-यांनी बदली प्रक्रियेत सहभाग घेतल्याने प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे.

जानेवारी महीन्या पासून अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे जि.प.ची धूरा हती आली.सात महीने उलटून जात असताना पदाधिकारी ,सदस्य, प्रशासनात समन्वय घडत नसल्याची ओरड होती, सीईओ प्रकाश वायचळ हे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करण्यात आला, सेसफंडाची स्थगिती , विकासकामाना बसलेला फटका , सदस्यांचे प्रलंबीत कामे ,असे विविध कारणामूळे सदस्यांमध्ये नाराजी पसरली होती.सर्वसाधारण सभा (जीबी) घेण्यासाठी प्रशासनाची उदासिनता असल्याची कैफीयत पदाधिका-यानी मांडली होती. सभेच्या परवानगीसाठी अध्यक्ष कांबळेसह सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने सीईओप्रती नाराजी वाढली गेली होती.

पदाधिका-यांच्या मते सीईओंनी जिल्हाधिकारी यांच्याशी पञव्यवहार करून परवानगी आणावी आशी आपेक्षा व्यकत करण्यात आली.सोमवारी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण , बांधकाम सभापती विजयराज डोंगरे , सदस्य आनंद तानवडे ,सदस्या शितलदेवी मोहीते, पक्षनेता आणाराव बाराचारे, विरोधीपक्षनेता बळीरामकाका साठे यांनी प्राथमिक चर्चा करीत सीईओ यांचे कार्यालय गाठलं, पदाधिकारी, सदस्यांच्या प्रलंबीत कामे, सेसफंडा वरील स्थगिती यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. सर्वसाधारण सभेसाठी प्रशासनाची उदासिनता का? असा प्रश्न उपस्थित चर्चे दरम्यान करण्यात आला.

यावर सीईओ प्रकाश वायचळ यांनी प्रशासनाने जीबीच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पञव्यवहार करुन पाठपूरावा केल्याचे सांगतीले यासह पदाधिका-यानी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे देत समाधान केलं , सरते शेवटी पदाधिकारी प्रशासनात समन्वय घडल्यामूळे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची भेट घेत सभेची परवानगी घेण्यात आली.मंगळवारी कर्मचा-यांच्या बदली प्रक्रिया पार पडणार होत्या या बदली प्रक्रियेस अध्यक्ष कांबळे , उपाध्यक्ष चव्हाण ,सभापतीना आमंत्रीत करण्यात आले होते असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बदली प्रक्रिये दरम्यान अध्यक्ष कांबळे यांनी दिलेल्या सुचनेनूसार बदल्या करण्यात आल्या , यावेळी सीईओंसह विभागप्रमूखांनी कोणती ही हारकत घेतली नाही.

सदस्यांचे प्रलंबित प्रश्न गुलदस्त्यात
विकासकामांवरून सदस्यांचे प्रश्न गुलदसत्यात पडून आहेत.विकासकामे खोळंबली असल्याची ओरड कायम आहे. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे सीईओ प्रकाश वायचळ यांनी घडवून आणत असलेला समन्वयाचा प्रयत्न टिकतो का नाही ? हे तर १० आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट होईल.

Read More आई आजारी असल्याचे निमित्त करुन युवतीवर अत्याचार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या