सोलापुर : मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी कंपन्या विकणाऱ्या, वर्षाला दोन कोटी रोजगाराचे आश्वासन देणाऱ्या, घंटा आणि थाळी वाजवून कोरोना पळून जातो म्हणणाऱ्या, चुकीच्या पद्धतीने GST लागू करणाऱ्या धोरणांचा निषेध करून युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
यावेळी पाकिस्तानी बिर्यानी खाणाऱ्या, शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या, कोरोनाचे पन्नास लाख रुग्ण करणाऱ्या, सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस दिनानिमित्त त्यांना सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने ‘तुघलक’ही उपाधी प्रदान करण्यात आली. त्याच प्रमाणे दरवर्षी दोन कोटी रोजगार देतो म्हणून रोजगार न देता उलट देशामध्ये बेरोजगारीचे उच्चांक वाढविणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून रोजगाराचे लॉलीपॉप वाटप करुन साजरा करण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की, इतिहासात घडून गेलेले तुघलक नावाचा राजा चित्र विचित्र निर्णयासाठी प्रसिद्ध होता, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंतप्रधान नरेन्द्र मोदी चित्र- विचित्र निर्णय घेऊन अर्थव्यवस्था, रोजगार, घंटा आणि थाळी वाजवून कोरोना जाईल म्हणणाऱ्या, शेतकरी विरोधी निर्णय, चुकीच्या पद्धतीने लागू केलेली नोटबंदी आणि GST या सारखे निर्णय घेऊन देशातील जनतेचे हाल करत आहेत म्हणून आज रोजी नरेंद्र मोदींना तुघलक ही पदवी प्रदान करुण, रोजगाराचे लॉलीपॉप वाटप करुण मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून आज रोजी पाळण्यात येणार आहे.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक विनोद भोसले, दक्षिण सोलापुर विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, उपाध्यक्ष राजासाब शेख, सुभाष वाघमारे, किरण राठोड, राजेंद्र शिरकुल, शरद गुमटे, आकाश गायकवाड़, संतोष अट्टेलुर, धम्मदीप जगजाप, अभिषेक गायकवाड़, शिवराज कोरे, नरेश येलूर आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री अमित देशमुख