25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home सोलापूर बार्शीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता तात्काळ ४०० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करा...

बार्शीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता तात्काळ ४०० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करा – ॲड.राजर्षी तलवाड-डमरे

एकमत ऑनलाईन

बार्शी (विवेक गजशिव) : बार्शी तालुक्यातील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेऊन व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्ण दगावू नये म्हणून भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष ॲड.राजर्षी तलवाड-डमरे यांच्यावतीने बार्शी तहसीलसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.

यावेळी निवेदनात ॲड. तलवाड-डमरे यांनी बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल,अंधारे हॉस्पिटल,सोमाणी हॉस्पिटल,कॅन्सर हॉस्पिटल येथे मोजकेच बेड शिल्लक असून बेड अभावी अनेक रुग्णांचे मृत्यु उदभवत आहेत. तर काही रुग्णांना परजिल्ह्यात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.तसेच भूम, परांडा, करमाळा, माढा, उस्मानाबाद येथील कोरोना रुग्ण बार्शीतील हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळेही बेडची कमतरता भासत आहे.

त्यामुळे त्या तालुक्यातच प्रशासनाने कोव्हिड सेंटर उभा करून त्यांच्यावर तिथेच उपचार करण्याची मागणी ॲड.तलवाड-डमरे यांनी केली.पुढे त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि त्याची रक्कम मिळवण्यासाठी संपूर्ण कुटुंब आजारी पाडण्याचे शासनाचे षडयंत्र आहे काय असा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले.यावेळी तहसीलदार जमदाडे व नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांनी ॲड.राजर्षी तलवाड-डमरे व आंदोलकांची भेट घेऊन यावर शासनदरबारी आपले म्हणणे मांडून लवकरात लवकर मार्ग काढणार असल्याचे सांगितले.

पुरुषोत्तम मास कमला एकादशी च्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी चा गाभारा आकर्षक फुलांनी सजला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या