37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeसोलापूरआवडीचे रूपांतर केले व्यवसायात

आवडीचे रूपांतर केले व्यवसायात

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जुळे सोलापूर येथे राहणा-या स्मिता तिम्माजी यांनी शिवण कौशल्याचा उपयोग करित व्यवसायाची उभारणी स्वत:च्या हिमतीवर कुणाचाही आधार न घेता केली. लक्ष्मी पुजेसाठी लागणा-या साड्यांची निर्मिती व विक्री त्या करतात. याबरोबरच स्मिज ब्युटी पार्लरही त्या चालवितात. अक्कलकोट व बेंगलोर येथे ब्यूटी पार्लरचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.

याबरोबरच श्रीलक्ष्मी कलेक्शन या नावाने पुजेच्या साडयांचा व्यवसाय स्मिता तिम्माजी यांनी उभा केला. त्यांची आई अक्कलकोट येथे शिवण क्लास घ्यायची त्यामुळे त्या स्टीचिंग शिकल्या. साड्यांच्या डिझाईनसाठी त्यांना आईचे मार्गदर्शन मिळाले.

पुजेसाठी लागणारे केळीचे खुंट लावायचे स्टॅण्ड, कलशचे स्टॅण्ड, खड्यांचे दागिने आदी वस्तुंची विक्रीही त्या करतात. स्वत:च्या कल्पनेने व कौशल्याने ही उत्पादने त्या बनवितात. बीकॉम पर्यंत शिक्षण घेतल्यावर वेगळे काही करण्याच्या उर्मिने स्मिता तिम्माजी यांनी ब्युटी पार्लर श्रीलक्ष्मी कलेक्शन उभे केले. आवड म्हणून सुरूवात केली आणि त्याचे रूपांतर व्यवसायात झाले. पुणे, मुंबई आदी शहरामधूनही त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे.

त्यांच्या पुजेच्या साडी विक्रीच्या व्यवसायामुळे ग्राहक त्यांना लक्ष्मी या नावाने तर ब्युटी पार्लरमुळे स्मिज या नावाने ओळखतात. भविष्यात व्यवसाय वाढविण्याची त्यांची इच्छा आहे. लोक त्यांच्या घरातील पुजेमध्ये स्मिता यांनी बनविलेल्या वस्तू वापरतात आणि कामाचे कौतुक करतात. याचे आत्मिक समाधान मोठी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम मिळतो हे समाधान आर्थिक उत्पन्नापेक्षा मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.

दांडीबहाद्दर ५ डॉक्टरासह ९ अधिका-यांना वेतनकपातीचा दणका

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या