21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeसोलापूरपंचवीस विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई

पंचवीस विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई

एकमत ऑनलाईन

सोलापूर : यंदा परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकांवर टिक मार्क करणे विद्यार्थ्यांना महागात पडले आहे. भरारी पथकांच्या निदर्शनास आहे. आल्यानंतर जागीच पंचवीस विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई झाली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आवारातील विविध विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. गुरुवारी जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार, पुढील पंधरा दिवसांत विद्यापीठाच्या चौकशी समितीसमोर विद्यार्थ्यांना हजार व्हावे लागेल. त्यानंतर समितीद्वारे विद्यार्थ्यांची चौकशी होईल. यात विद्यार्थ्यांकडून जबाब घेतला जाणार आहे. गुरुवारी एकाच दिवशी पंचवीस जणांवर कारवाई झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरल्याची माहिती काही पालकांनी दिली.

बुधवारी एमएस्सी तसेच एम.ए. मास पदवी आणि पदव्युत्तर कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनाही पंधरा ते वीस मिनिटे प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्या. त्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या नियोजनात गोंधळ उडाल्याने विद्यापीठाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाच्या चुकांमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

पदवी आणी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये गोंधळ होत असल्याने विद्यार्थी काळजीत आहेत. पदवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी एक ते दीड तास प्रश्नपत्रीका उशीरा मिळाल्या असे पालकांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या