23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeसोलापूरमोहोळ तालुक्यात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत

मोहोळ तालुक्यात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत

एकमत ऑनलाईन

राजेश शिंदे मोहोळ : मोहोळ तालुक्यात कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्यवहार ठप्प होत आहेत तर भीतीमुळे लोकांच्या नैराश्यात वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येचे शतक पार झाले असून कोरोनाची वाटचाल द्विशतकाकडे सुरू आहे २९ जुलै रोजी तालुक्याच्या ग्रामीण भागात ३४ तर शहरामध्ये ६ असे एकूण ४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मोहोळ तालुक्यात आज आष्टे गावात २, कामती ( ब्रु ) १, कोरवली १, वाघोली १, यावली १ असे ६ कोरोना रुग्ण आढळून आले. मोहोळ शहरामध्ये दोन दिवसामध्ये एकही कोरोना रुग्ण मिळाला नाही.

मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने कडकडीत लॉकडाऊन घोषित केला आहे. तरीही रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये मोहोळ शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र दीड महिन्यापूर्वी मोहोळ तालुक्यामध्ये प्रथम पाटकुल येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. तर शहरांमध्ये पंधरा दिवसापूर्वी पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरानाने शहरा सोबत ग्रामीण भागातही हळूहळू पाय पसरायला सुरूवात केली असून ग्रामीण भागांची संख्या आणि शहराची संख्या २२६ मिळून तालुक्याची एकूण रुग्णांची संख्या झाली आहे.

२९ जुलै रोजी एकुण १२१ रुग्णांवर उपचार चालू असून ९७ रुग्ण बरे झाल्यान त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ७ रुग्ण कोरोनाने मयत झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोना पॉझिटिव रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आरोग्य प्रशासन व मोहोळ नगर परिषद काटेकोर अंमलबजावणी करीत असल्याचे कागदावर दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र तालुका आरोग्य विभाग आणि नगरपरिषद प्रशासन कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे.

Read More  रुग्णालयाचा गलथान कारभार सुधारावा अन्यथा आंदोलन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या