23.3 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeसोलापूरकोरोना डयुटी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा

कोरोना डयुटी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांना शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करणे बंधनकारक आहे. महापालिका आयुक्­तांनी आदेश देऊनही ड्यूटीवर हजर न राहणा-या 37 शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यातील 15 शिक्षक आता रुजू झाले असून उर्वरित शिक्षकांनी अजूनही ड्यूटी जॉईन केली नाही. त्यामुळे त्यांना वेतन देऊ नये, असे आदेश आता महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढले जात आहेत.

कोरोनाची लाट आटोक्­यात यावी या हेतूने शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. शहरात एकाचवेळी एक हजार 50 शिक्षक प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करीत आहेत. सर्व्हेसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या जवळपास अडीच हजार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. कोरोनाचा सर्व्हे करताना 50 ते 55 वर्षांवरील शिक्षक, को-मॉर्बिड शिक्षकांसह दिव्यांग, 20 व 40 टक्­क्­यांवरील शिक्षक, शिक्षणसेवक, गर्भवती महिला शिक्षिकांना कोरोना ड्यूटीतून सवलत देण्यात आली आहे.

कोरोना सर्व्हे अथवा कॉन्टॅक्­ट ट्रेंिसगचे काम करताना मयत झालेल्या कोणत्याही शासकीय कर्मचा-यास शासनाकडून 50 लाखांचे विमा कवच दिले जात आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव 30 जूनपर्यंत पाठवावा लागणार असून, त्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घरोघरी जाऊन सर्व्हे करणारे 32 शिक्षक कोरोनाबाधित झाले (30 मार्च 2021 पासून) असून त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

मात्र, ड्यूटीवर हजर न राहणा-या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश देणा-या महापालिका प्रशासनाने मयत शिक्षकांच्या मदतीचा प्रस्ताव अजूनही पाठविलेला नाही. दरम्यान, प्रस्ताव पाठविण्याची मुदत शासनाने 30 जूनपर्यंत वाढविल्याने आता त्यांचा मदतीचा प्रस्ताव पाठविण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

हिंगोलीत मोफत बियाणांसाठी शेतक-यांची गैरसोय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या